Team My Pune City – जुन्या वादामुळे पिंपरी चिंचवडमध्ये ( Sangvi Crime News) कोयत्याचा धाक दाखवून मारामारी झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना 14 ऑगस्ट रोजी रात्री 10 ते 10.30 वाजण्याच्या सुमारास नवी सांगवी येथील विडा पान सेंटर समोर घडली.
Crime News : सोनसाखळी चोरट्याला अटक, 15 गुन्हे उघडकीस
या प्रकरणात आर्यन ज्ञानदेव गाडेकर (17, नवी सांगवी) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात ( Sangvi Crime News) फिर्याद दिली आहे. विनोद तलवारे (19, दापोडी), अनिकेत अनिलखेडे (20, नवी सांगवी), प्रणव अमर रोखडे (20, पिंपळे गुरव), वेदांत राजेश साईल (19, साई चौक), अविष्कार अंकुश मोरे (20, सांगवी), ऋतुपर्ण शशिकात कडलग (19, कृष्णा नगर) आणि अदित्य विश्वभर सुर्यवंशी (19, पिंपळे गुरव), असित राहुल धिवार (18, पिंपळे गुरव) यांना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आर्यन गाडेकर आणि त्यांचा मित्र ईश्वर शिंदे हे नवी सांगवी येथे थांबले असताना आरोपींमध्ये आपापसात वाद सुरू होता. आरोपींपैकी एकाने फिर्यादींना त्याच्या सोबत थांबण्यास सांगितले. त्याचवेळी एका आरोपीने कोयता ( Sangvi Crime News) काढला असता, फिर्यादींनी त्यांना भांडण न करण्याचे आणि कोयते न काढण्याचे सांगितले. त्यानंतर फिर्यादी आणि त्यांचे मित्र तिथून निघून मल्हार गार्डन हॉटेलच्या बाजूला असलेल्या पान टपरीवर गेले.
त्याचा राग मनात धरून, आरोपी त्यांच्या दुचाकीवरून तिथे आले आणि त्यांनी फिर्यादी आणि त्यांच्या मित्राला शिवीगाळ करून त्यांना मारण्याच्या उद्देशाने त्यांच्या डोक्यावर आणि हातावर कोयत्याने वार केले. आरोपींनी फिर्यादीला लाथा-बुक्क्यांनीही मारहाण केली आणि हवेत कोयते फिरवून “आम्ही येथील भाई आहोत, आमच्या नादाला लागू नका” अशी धमकी दिली. जाताना आरोपींनी फिर्यादीच्या गाडीवरही कोयत्याने वार करून नुकसान केले. या प्रकरणी सांगवी पोलीस तपास ( Sangvi Crime News) करत आहेत.