


म. भा .चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि अध्यक्षतेखाली या आठव्या नक्षत्र महाकाव्यसंमेलनाचे उदघाटन झाले. यावेळी मंचावर ग्रामगीताचार्य राज्य समन्यवयक, बंडोपंत बोढेकर , डॉ शांताराम कारंडे,डॉ अलका नाईक, संयोजक कवी प्रा.राजेंद्र सोनवणे व्यासपीठावर उपस्थित होते.
प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष राजेंद्रजी सोनवणे यांनी करताना संस्थेची आतापर्यंतची माहिती विशद केली.अनेक संकटावर मात करत त्यांनी या संस्थेची २५ वर्षाची कारकीर्द ओघवत्या शैलीत सादर केली.
उदघाटनाआधी एका वृक्ष रोपट्याला पाणी अर्पण करून अभिनव पद्धतीने या महाकाव्यसंमेलनाची सुरुवात झाली.यालाच अनुषंगाने अध्यक्ष म .भा .चव्हाण यांनी “ज्यांना कोणीच नाहीत त्यांनी फक्त झाडेच लावावीत” ही आपली लोकप्रिय कविता घेत अध्यक्षीय भाषणाची सुरुवात केली.
कार्यक्रमाच्या दरम्यान काही लेखकांच्या पुस्तकांचेही प्रकाशन म .भा .चव्हाण , शिवव्याख्याते डॉ नामदेव जाधव यांच्या शुभहस्ते झाले.जगातल्या कुठल्याही औषधापेक्षाही माणसाला आनंदी आणि टवटवीत ठेवणारे साहित्य म्हणजे कविता असे प्रतिपादन अध्यक्ष चव्हाण यांनी व्यक्त केले.
यावेळी प्रा उन्मेष शेकडे, लातूर यांच्या एकाच वेळी दहा काव्यसंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले.मायबाप,वावर, शेतकरी,निलादेवी,रानोमाळ,रान चांदणं, कोंब पीक,तास पाणी, रान कष्ट, रानशब्द हे रेकॉर्ड कार्यक्रम झाला.
रामदास अवचर-चिऊताईचं लगीन,अशोक उघडे -वंदन माझे महापुरुषांना, रेश्मा पानसरे -बंध रेशमाचे,अनंत तेलंग -काव्य फुलोरा, बालाजी थोरात -संवेदना जीवनाच्या,कमल आठवले -मनातील कवडसा, कवी -वादळकार-सुविचार संग्रह २०२५ या पुस्तकाचे प्रकाशन झाले.आपल्या चिरपरिचित शैलीत पण मोजक्या शब्दात त्यांनी खुमासदार अध्यक्षीय भाषण केले.
डॉ श्वेता राठोड-कटारिया यांनी प्रभावी सूत्रसंचालन केले. तर डॉ अलका नाईक यांनी आभारप्रदर्शन केले.यानंतरच्या सत्रात राज्यभरातून आलेल्या विविध कविंच्या सुंदर कवितांचे काव्यसंमेलन, परिसंवाद असे आणखी उत्तम आणि दर्जेदार कार्यक्रम या महाकाव्यसंमेलनाचे खास वैशिष्ट्य ठरले.
या महासंमेलनासाठी आलेल्या कवीना सन्मानपत्र, गौरवचिन्ह देऊन गौरवण्यात आले. तर त्यांच्या निवासाची सुद्धा व्यवस्था कवी राजेंद्र सोनवणे यांनी केली असल्याचे सांगितले.
सलग दोन दिवस हे महाकाव्य संमेलन रंगणार आहे. शहरातील नागरिकांना यात खुला प्रवेश आहे.