Team My Pune City –मराठी चित्रपट पिंजरामध्ये काम करणाऱ्या(Sandhya Shantaram) ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचे वयाच्या 97व्या वर्षी त्यांचे निधन झाले आहे. काल संध्या यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. संध्या या व्ही शांताराम यांच्या दुसऱ्या पत्नी होत्या.त्यांच्या निधनानंतर चित्रपटसृष्टीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
संध्या शांताराम त्यांनी मराठीसह हिंदी सिनेमांमध्ये स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. शनिवारी सकाळी साडे दहा वाजता राजकमल स्टूडिमधून त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली होती. त्यांच्या पार्थिवावर शिवाजी पार्क येथील वैकुंठधाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले.
Pune : लोककलांचे विकृतीकरण थांबणे आवश्यक – डॉ. सदानंद मोरे
Indrayani Junior College : तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत इंद्रायणी कनिष्ठ महाविद्यालयातील मुलांचे घवघवीत यश
संध्या यांनी ‘दो आंखें बारह हाथ’, ‘झनक झनक पायल बाजे’ आणि ‘जल बिन मछली नृत्य बिन बिजली’ सारख्या चित्रपटांमध्ये काम केले होते. त्यानांतर ‘पिंजरा’ या चित्रपटातील त्यांची भूमिका विशेष गाजली होती.