क्रिएटिव्ह फाउंडेशन च्या माध्यमातून “राजकारण” विरहित “समाजकारणाची” पंचवीस वर्षे.
Team My Pune City – विविध मंडळाना उपयुक्त वस्तू भेट देताना दीपावली चा(Sandeep Khardekar) आनंद द्विगुणित होत असल्याचे क्रिएटिव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर म्हणाले. दीपावली निमित्ताने विविध गणेशोत्सव मंडळ, विविध संस्था, संघटना, ज्येष्ठ नागरिक संघ, ज्ञाती संस्था,अनाथाश्रम, दिव्यांग केंद्र, वृद्धाश्रम यांना उपयुक्त भेट वस्तू देण्याच्या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मा. नगरसेविका व क्रिएटिव्ह फाउंडेशन च्या विश्वस्त मंजुश्री खर्डेकर, भाजपा च्या कोथरूड मंडल उपाध्यक्ष अनघाताई जगताप,भाजपा चे सुधीर फाटक, बाल तरुण मंडळ पौड फाटा चे पदाधिकारी अनिकेत मोकर,युवराज कोंडे, यश मोकर, सिद्धांत कुडले, ओंकार मित्र मंडळ चे तुषार दिघे, गणेशनगर मंडळाचे मनीष चव्हाण, पार्थ पालकर, सिद्धांत मगर, साई पालकर,कुमार युवक मित्र मंडळाचे प्रसाद तावरे, उमेश माने,बाल तरुण मित्र मंडळ पांडुरंग कॉलोनी चे हर्षल होजगे, अभिजित साबळे, पार्थ तावरे, अष्टविनायक मित्र मंडळाचे सिद्धेश करंजकर व इतर मान्यवर उपस्थित होते.
Annual Horoscope 2026 : वार्षिक राशीभविष्य 2026
क्रिएटिव्ह फाउंडेशन च्या माध्यमातून राजकारण विरहित समाजकारणाचे हे पंचवीसावे वर्ष असून 2001 साली ह्या कार्याला सुरुवात झाली आणि 2007 साली सह धर्मादाय आयुक्तांकडून नोंदणी प्रमाणपत्र व सचोटीने समाजकार्य व पारदर्शी व्यवहारामुळे आयकर विभागाचे कर सवलतीचे “80 जी” हे प्रमाणपत्र देखील मिळाले असेही संदीप खर्डेकर म्हणाले.पुण्यनगरीत अनेक दानशूर व्यक्ती असून त्यांच्या देणगीवर फाउंडेशन चे काम सुरु असून येणाऱ्या काळात सी एस आर निधीच्या माध्यमातून शाश्वत प्रकल्प उभारणीवर भर देणार असल्याचे संदीप खर्डेकर म्हणाले.
यावेळी ओम नवनाथ मित्र मंडळ, बाल तरुण मित्र मंडळ, पांडुरंग कॉलोनी,एरंडवणा मित्र मंडळ,कर्वे रोड,दशभुजा मित्र मंडळ, कर्वे रोड यांना कपाट तर इतर मंडळाना खुर्च्या व वॉटर प्युरिफायर भेट देण्यात आले व दीपावली च्या शुभेच्छा देण्यात आल्या.
सौ.मंजुश्री खर्डेकर यांनी दीपावली च्या शुभेच्छा देतानाच ” आपण आपल्या कुटुंबासह दिवाळी साजरी करत असताना समाजात ज्यांच्या कडे काही कमी आहे जे गरजू आहेत त्यांनाही आपल्या आनंदात सहभागी करून घेतले पाहिजे व फूल ना फुलाची पाकळी म्हणून त्यांच्यासाठी ही काही मिठाई, कपडे, दिवे किंवा इतर वस्तूंचा छोटासा का होईना वाटा देऊन आपली सामाजिक बांधिलकी जपली पाहिजे असे सांगितले.
उपस्थित कार्यकर्त्यांच्या वतीने सुधीर फाटक यांनी आभार व्यक्त करताना ” क्रिएटिव्ह फाउंडेशन तर्फे कायमस्वरूपी उपयोगी वस्तूंची भेट हा नवा पायंडा सर्वांनीच अनुकरण करावे असा असल्याचे मत व्यक्त केले.