Saint Dnyaneshwar Maharaj: संत ज्ञानेश्वर महाराज सप्त शतकोत्तर सुवर्ण महोत्सवानिमित्त आळंदीत कार्यक्रम

Updated On:
---Advertisement---

Team MyPuneCity – श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी आणि समस्त ग्रामस्थ (Saint Dnyaneshwar Maharaj)श्री क्षेत्र आळंदी देवाची यांच्या संयुक्त विद्यमाने श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या 750 व्या जन्मोत्सवानिमित्त (सप्त शतकोत्तर सुवर्ण महोत्सव) शनिवार, दि. 3 मे ते शनिवार, दि. 10 मे या कालावधीत भव्य ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व अंखड हरीनाम सप्ताहाचे आळंदी येथे आयोजन करण्यात आले आहे.याची बैठक दि.28 रोजी पार पडली. पालखी सोहळा प्रमुख भावार्थ देखणे यांनी या सोहळ्या बाबत रूप रेषेची माहिती दिली.

यामध्ये ज्ञानेश्वरी पारायण, सकाळ कीर्तन, चरित्र चिंतन, प्रवचन, हरिपाठ, सायंकालीन कीर्तन,संगीत भजन असे विविध कार्यक्रम सप्ताहात होणार आहेत.

कार्यक्रम गट क्र. 223, ग्रामदैवत श्री भैरवनाथ पटांगण, नवीन सद्‌गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेसमोर, चाकण रोड, श्री क्षेत्र आळंदी देवाची येथे होणार आहे. सप्ताहाअंतर्गत दररोज सकाळी 6 ते 10 या वेळात ज्ञानेश्वरी पारायण होणार आहे. दि. 3 रोजी सकाळी 10 वाजता ह. भ. प. बापूसाहेब महाराज देहूकर यांचे कीर्तन, दुपारी 4 वाजता ह. भ. प. चैतन्य महाराज कबीर यांचे प्रवचन, सायंकाळी 6:30 वाजता ह. भ. प. बाळासाहेब महाराज शेवाळे यांचे कीर्तन होणार आहे.

दि. 4 रोजी सकाळी 10 वाजता, ह. भ. प. अच्युत महाराज दस्तापुरकर यांचे कीर्तन, दुपारी 4 वाजता ह. भ. प. विष्णू महाराज केंद्रे यांचे प्रचवन, सायंकाळी 6:30 वाजता ह.भ. प. प्रमोद महाराज जगताप यांचे कीर्तन होणार आहे.

दि. 5 रोजी सकाळी 10 वाजता ह. भ. प. भागवत महाराज शिरवळकर यांचे कीर्तन,दुपारी 4 वाजता ह. भ. प. यशोधन महाराज साखरे यांचे कीर्तन, सायंकाळी 6:30 वाजता ह. भ. प. जयवंत महाराज बोधले यांचे कीर्तन होणार आहे.

दि. 6 रोजी सकाळी 10 वाजता ह. भ. प. प्रसाद महाराज बडवे यांचे कीर्तन, दुपारी 4 वाजता ह. भ. प. रामकृष्ण महाराज लहावितरक यांचे प्रवचन, सायंकाळी 6:30 वाजता ह. भ. प. पांडुरंग महाराज घुले यांचे कीर्तन होणार आहे.

दि. 7 रोजी सकाळी 10 वाजता ह. भ. प. ज्ञानेश्वर महाराज नामदास यांचे कीर्तन, दुपारी 4 वाजता ह. भ. प. नारायण महाराज जाधव यांचे प्रवचन, सायंकाळी 6:30 वाजता ह. भ. प. केशव महाराज उखळीकर यांचे कीर्तन होणार आहे. दि. 8 रोजी सकाळी 10 वाजता ह. भ. प. विठ्ठल महाराज वासकर यांचे कीर्तन, दुपारी 4 वाजता ह. भ. प. सदानंद महाराज मोरे यांचे प्रवचन, सायंकाळी 6:30 वाजता ह. भ.प. रामभाऊ महाराज राऊत यांचे कीर्तन होणार आहे.

दि. 9 रोजी सकाळी 10 वाजता ह. भ. प. भरत महाराज पाटील यांचे कीर्तन, दुपारी 2 वाजता श्री संत नामदेव महाराज यांच्या 675 च्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त श्री संत नामेदव महाराज वाड्मय चिंतन कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून ह. भ. प. चंद्रशेखर महाराज देहगलूरकर प्रमुख वक्ते आहेत. सायंकाळी 6.30 वाजता ह. भ. प. चंद्रशेखर देगलूरकर यांचे कीर्तन होणार आहे.

दि. 10 रोजी सकाळी 10 वाजता ह. भ. प. शांतीब्रह्म श्री. गु. मारोती महाराज कुरेकर यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे.


Pimpri News : दहशतवाद्यांना प्रत्युत्तर देण्यास मोदी सक्षम – रामदास आठवले
 

दि. 3 मे ते दि. 5 मे रोजी दुपारी 1:30 वाजता जगद्‌गुरु श्री संत तुकाराम महाराज यांच्या 375 व्या वैकुंठगमन सोहळ्यानिमित्त जगद्‌गुरु श्री संत तुकाराम महाराज चरित्र चिंतन या विषयावर ह. भ. प. रामभाऊ महाराज राऊत तर दि. 6 मे ते दि. 8 मे रोजी श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त श्री संत ज्ञानेश्वर महाराज चिंतन या विषयावर ह. भ. प. चैतन्य महाराज देगलूकर बोलणार आहेत. 9 मे संत नामदेव महाराज या विषयावर चिंतन होणार आहे.

दि. 3 रोजी ह. भ. प. विश्वनाथ महाराज वारिंगे, दि. 4 कल्याण गायकवाड, विष्णू महाराज सोळुंके, राधाकृष्ण गरड, आदिनाथ सटले भजन-कीर्तन सेवा बजावणार आहेत. दि. 5 रोजी महादेव बुवा शहाबाजकर सेवा बजावणार असून दि. 6 रोजी परमेश्वर महाराज जायभाय, पंढरीनाथ आरु, महेश महाराज भगुरे, ज्ञानेश्वर महाराज मेश्राम वारकरी भजन सादर करणार आहेत. दि. 7 रोजी विठ्ठलदास महाराज (गोविंदपूरम – तामिळनाडू) यांची भजन-कीर्तन सेवा होणार असून दि. 8 रोजी बहुरूपी भारुड या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दि. 9 रोजी सायंकाळी 5 वा.प्रदक्षिणा होणार आहे.
Nilam Gorhe: लोणावळा परिसरात येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना कराव्यात – डॉ. नीलम गोऱ्हे

श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या जन्माचे सप्त शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी (७५०) जन्मवर्ष निमित्ताने दिनांक ०३ मे ते १० मे या कालावधीत श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी व समस्त आळंदीकर ग्रामस्थ, आळंदी आयोजित अखंड हरिनाम सप्ताह

व्यवस्था

१ कार्यक्रम मंडप जर्मन हंगर वॉटरप्रुफ ३५० बाय २००

२ भोजन मंडप : वॉटरप्रुफ ३०० बाय २००

३ निवास मंडप : वॉटरप्रुफ २५५ बाय ९०

४ नामजप मंडप : ९० बाय ८०

४ ग्रीन रूम

५ व्हिआयपी कक्ष, कॉन्फरन्स हॉल

६ कुलर १००

७ फॅन

८ स्प्रिंक्लर

९ जनसेट ४ नग

१० एसी

११ एलइडी वॉल, १६ बाय ६० स्किन ८ बाय १२ ५ कमेरे

१२ खुर्च्या ५००० नग

१३ पिण्यासाठी थंड पाण्याचे जार

१४ अल्पोपहार, चहा, दुपारी व रात्री भोजन

१५ श्री ज्ञानेश्वरी पारायणासाठी भाविकांना( मोफत) ज्ञानेश्वरी, पासेस

१६ ७००० भाविकांची निवास व्यवस्था धर्मशाळा, शाळांमध्ये

१७ धर्मशाळांमध्ये २० टँकरने पाणीपुरवठा

१८ कार्यकमाचे स्थळी १५० टॉयलेटस्

१९ स्नानगृहे पुरूष, महिला स्वतंत्र ५०

२० वारकरी विद्यार्थी, स्वकाम सेवा स्वयंसेवक

२१ ३ अग्निशमन दल सेवा

२२ आरोग्य सेवा

अशी यावेळी बैठकीत माहिती देण्यात आली.मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी आरोग्य सेवा,पाणीपुरवठा सेवा, अग्निशमन सेवा व विद्युत पुरवठा इ.सेवा माहिती देण्यात आली.2 कोटी रु.निधी राज्य शासनाकडून मंजूर झाला आहे.याबाबत माहिती त्यांनी सांगितली.प्रमुख विश्वस्त योगी निरंजन नाथ यांनी गोषवारा व चैतन्य महाराज कबीर यांनी सोहळ्या बाबत माहिती दिली.

यावेळी विश्वस्त राजेंद्र उमाप, व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर व ग्रामस्थ ,पोलीस अधिकारी ,देवस्थान कमरचारी वर्ग उपस्थित होते.

Follow Us On