Team MyPuneCity – संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या ७५०व्या जयंतीनिमित्त ( Sant Dnyaneshwar Maharaj ) महाराष्ट्र शासनाने यंदाचे वर्ष “सप्तशतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जयंती वर्ष” म्हणून साजरे करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भातील परिपत्रक नगर विकास विभागाने आज प्रसिद्ध केले असून, येत्या १५ ऑगस्ट २०२५ रोजी ‘गोकुळ अष्टमी’च्या दिवशी राज्यातील सर्व महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषदा व नगरपंचायतींना उत्सव साजरा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
Shankar Jagtap: पिंपरी-चिंचवडला उपलब्ध होणार तीन दिवसांचा अतिरिक्त पाणीपुरवठा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या २८ जुलै रोजीच्या सूचनांनंतर हा निर्णय घेण्यात आला असून, सायंकाळी ५ ते ७ या वेळेत संत ज्ञानेश्वर महाराजांच्या प्रतिमा किंवा मूर्तीच्या पालखी मिरवणुका स्थानिक स्वराज्य संस्थांनी काढाव्यात, असे स्पष्ट आदेश शासनाने दिले आहेत. या उपक्रमात भक्तीपर वातावरण, हरिपाठ, अभंग गायन यांचा समावेश करून समाजात अध्यात्मिक व सांस्कृतिक जागृती निर्माण करावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.
Rashi Bhavishya 31 July 2025 : कसा जाईल आपला आजचा दिवस?
नगर विकास विभागाचे अवर सचिव अनिलकुमार रा. उगले यांच्या स्वाक्षरीने जारी करण्यात आलेल्या या परिपत्रकात, सर्व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांनी या सूचनांची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे स्पष्ट नमूद करण्यात आले आहे. शासनाने हे परिपत्रक डिजिटल स्वाक्षरीसह अधिकृत संकेतस्थळावरही प्रसिद्ध केले आहे.
ही उत्सवसंध्या महाराष्ट्रातील संत परंपरेचा गौरव वाढवणारी ठरणार असून, युवकांमध्ये ज्ञानेश्वरी विचारांची प्रेरणा देणारी ठरेल, अशी अपेक्षा राज्य सरकारने व्यक्त केली ( Sant Dnyaneshwar Maharaj ) आहे.