मालेगाव बॉम्ब स्फोट खटल्यात साध्वी प्रज्ञा यांची निर्दोष मुक्तता
Team My pune city – मालेगाव बॉम्ब स्फोट खटल्याचा निकाल लागला आहे. तब्बल 17 वर्षानंतर NIA कोर्टाने हा निकाल दिला ( Sadhvi Pragya ) असून साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्यासह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे.
मालेगावच्या भिक्कू चौकात 29 सप्टेंबर 2008 ला बॉम्बस्फोट झाला होता. या बॉमस्फोट प्रकरणात 6 निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला होता, 100 पेक्षा जास्त लोक यात जखमी झाले होते. आज न्यायाधीश एके लाहोटी यांच्या कोर्टाने निकाल दिला. यात साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर मुख्य आरोपी होत्या. आरोपी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्यासह सात जणांना मृत्युदंडाची शिक्षा देण्याची मागणी एनआयएने न्यायालयाकडे केली होती. आज विशेष न्यायालयाने निकाल देताना 17 वर्षानंतर सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली. त्यावर आता साध्वी प्रज्ञा यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Manache Ganpati : मानाच्या गणपती पाठोपाठ मंडई आणि भाऊसाहेब रंगारी मंडळाच्या गणपतीचे ही होणार विसर्जन
Poultryshed : पोल्ट्रीशेड नोंदणी अभियान मावळात वेगाने सुरू
साध्वी प्रज्ञा म्हणाल्या की, ‘मला जेंव्हा तपसयंत्रांनी बोलावल तेंव्हा मी सहकार्याच्या भावनेने आले होते. पण मला पोलीस कोठडीत ठेवलं, अपमान केला ,मारहाण ( Sadhvi Pragya ) केली.’ कोर्टासमोर बोलताना साध्वी प्रज्ञाना रडू कोसळलं.
पुढे त्या म्हणाल्या, ‘माझा समाजात अपमान झाला. पूर्ण आयुष्य संन्यास घेऊन जगले पण मला लोक वाईट नजरेने बघायचे, अपमानित करायचे.माझ्यावरून भगव्या रंगाला कलंकित केलं गेलं. १७ वर्षात मी पहिल्यांदा आनंदी झाले आहे. अपमानचे आयुष्य मी १७ वर्षे जगत होते. भगव्याला आतंकवाद बोलले गेले ,आज भगव्याचा विजय झाला हिंदुत्वाचा विजय झाला.‘
‘ज्यानी भगव्यावर अत्याचार केला त्यांना देव शिक्षा देईल. मी आता प्रसन्न आहे. मी आपले आभार मानते, धन्यवाद देते. निर्दोष सुटूनही सामाजिक जीवनात जे नुकसान झालेलं आहे त्याच ( Sadhvi Pragya ) काय करायचं,असेही त्या म्हणाल्या.