situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Sachin Khinwasara : वाहने घेऊन फसवणूक करणाऱ्या सचिन खिंवसराला अटक

Published On:
Sachin Khinwasara

Team My Pune City –चांगला परतावा देण्याच्या तसेच ( Sachin Khinwasara) आजारपणात मदत म्हणून ने आण करण्याच्या बहाण्याने चारचाकी वाहने घेऊन नागरिकांची लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या सचिन रमेश खिंवसरा याला चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे. सचिन याच्यासह दिप्ती किशोर सेठ या बंटी बबली विरोधात भोसरी, देहूरोड, चिंचवड पोलीस ठाण्यात नऊ गुन्हे दाखल आहेत. न्यायालयाने बंटी बबली विरोधात अरेस्ट वॉरंट जारी केले होते.

Breaking News : पुण्यात गणेश विसर्जनाच्या आदल्या दिवशी गॅंगवॉर ; नाना पेठेत गोळीबारात खून

चिंचवड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात सर्जेराव ढवळे ( Sachin Khinwasara) यांनी फिर्याद दिली आहे. सर्जेराव यांच्याशी आरोपींनी ओळख केली. दिप्ती हिने तिचे वडील आजारी असून त्यांची ने आण करण्यासाठी म्हणून सर्जेराव यांची कार मागितली. सर्जेराव यांनी त्यांची कार दिली. ती परत न देता त्यांची फसवणूक करण्यात आली. ही घटना मे 2025 मध्ये घडली. घटना घडल्यानंतर आरोपी पसार झाले होते.

Srujan Nrutyalay : मंदिरे हा भारतीय संस्कृतीचा अमूल्य ठेवा _ आशुतोष बापट

या बंटी बबलीने आणखी वेगळ्या पद्धतीने नागरिकांची फसवणूक ( Sachin Khinwasara) केली आहे. वाहन मालकाला हाताशी धरून त्याचे वाहन नागरिकांकडे गहाण ठेवले जात. चार पाच दिवसानंतर वाहन मालक संबंधित व्यक्तीकडे जाऊन वाहनावर त्याचा मालकी हक्क सांगत आणि वाहन घेऊन जात. अशाही पद्धतीने अनेकांची फसवणूक केली आहे.

आरोपींनी नागरिकांना पोलादपूर, महाबळेश्वर येथील जमीन दाखवून त्या विकण्याचे आमिष दाखवले. त्याबाबत बनावट कागदपत्रांच्या आधारे खरेदीखत करून ( Sachin Khinwasara) नागरिकांची फसवणूक केल्याचेही सांगितले जात आहे. फसवणूक झालेल्या नागरिकांनी सचिन याला पकडून देणाऱ्याला दहा लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. सचिन खिंवसरा याला अटक करण्याबाबत पिंपरी आणि वडगाव मावळ न्यायालयाने अरेस्ट वॉरंट काढले आहेत. चिंचवड पोलिसांनी त्याला अटक केली असून तपास सुरू आहे.

Follow Us On