Team My Pune City – शहरातील गँगवॉरमुळे गाजत ( Rupesh Marne) असलेल्या पुण्यात पोलिसांनी आणखी एक मोठी कारवाई केली आहे. गजानन उर्फ गजा मारणे टोळीतील महत्त्वाचा सदस्य रुपेश मारणे याला कोथरूड पोलिसांनी सोमवारी रात्री उशिरा मुळशी तालुक्यातील आंदगाव येथून ताब्यात घेतले. अभियंता देवेंद्र जोग यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी तो गेल्या नऊ महिन्यांपासून फरार होता.
Jain Boarding Case : जैन बोर्डिंग प्रकरणात मोहोळ यांचं नाव विनाकारण ओढलं जातंय – देवेंद्र फडणवीस
फेब्रुवारी महिन्यात शिवजयंतीच्या दिवशी कोथरूड परिसरात झालेल्या घटनेत संगणक अभियंता आणि भाजप कार्यकर्ता देवेंद्र जोग यांच्यावर काही गुंडांनी हल्ला केला होता. या घटनेला राजकीय वळण लागले होते. त्यानंतर केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध नोंदवत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली ( Rupesh Marne) होती.
या प्रकरणात सहभागी असलेल्या काही आरोपींना पोलिसांनी आधीच अटक केली होती. मात्र, मुख्य आरोपींपैकी रुपेश मारणे घटनेनंतर पसार झाला होता. गेल्या नऊ महिन्यांपासून पुणे पोलिस त्याच्या शोधात होते. अखेर पोलिसांनी सापळा रचून आंदगाव येथून त्याला पकडले. दरम्यान, टोळीचा म्होरक्या गजानन मारणे सध्या तुरुंगात असून, त्याचा निकटवर्तीय रुपेश मारणे बाहेरून टोळीचा कारभार पाहत असल्याचे तपासात समोर आले आहे. कोथरूड पोलिस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गंभीर गुन्ह्यांची नोंद असून, पुढील चौकशी सुरू ( Rupesh Marne) आहे.



















