Team My Pune City – राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) नेत्या रुपाली पाटील ठोंबरे (Rupali Patil Thombre) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. पक्षशिस्तभंगाच्या आरोपांमुळे त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून स्पष्टीकरणाची नोटीस पाठविण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी माधवी खंडाळकर यांनी सोशल मीडियावर रुपाली पाटील ठोंबरे यांच्याबाबत वादग्रस्त पोस्ट केली होती.
Vadgaon Nagar Panchayat : वडगाव नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी २४ मतदान केंद्रांची तयारी पूर्ण
या पोस्टवरून ठोंबरे यांच्या बहीण प्रिया सुर्यवंशी, मावशी वैशाली पाटील, पूनम गुंजाळ आणि अमित सुर्यवंशी यांनी खंडाळकर यांना मारहाण केल्याची घटना घडली होती. या प्रकरणी खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी या प्रकरणाची दखल घेतली. मात्र, ठोंबरे यांनी चाकणकर यांच्यावर महिला आयोगाच्या पदाचा गैरवापर करून त्यांच्या कुटुंबातील सदस्यांवर गुन्हा दाखल केल्याचा आरोप (Rupali Patil Thombre) केला.
या वक्तव्यांमुळे पक्षशिस्तभंगाचा मुद्दा उपस्थित झाला असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य सरचिटणीस आमदार संजय खोडके यांनी ठोंबरे यांना नोटीस पाठवली आहे. नोटिशीत म्हटले आहे की, पक्षाच्या प्रदेश प्रवक्त्या म्हणून जबाबदारी सांभाळताना महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर केलेली सार्वजनिक टीका पक्षशिस्तभंगास पात्र आहे. त्यामुळे आपल्या विरोधात कारवाई का करू नये, याचे स्पष्टीकरण देण्यास सांगण्यात आले आहे.
या पार्श्वभूमीवर रुपाली पाटील ठोंबरे यांनी आज उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांची पुण्यात भेट घेतली. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की, “मी माझी भूमिका अजित पवार साहेबांसमोर मांडणार आहे आणि त्यानंतरच माध्यमांसमोर प्रतिक्रिया देईन.” या प्रकरणामुळे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)मध्ये नव्या वादळाची चिन्हे दिसत असून, रुपाली पाटील ठोंबरे यांच्या पुढील भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले (Rupali Patil Thombre) आहे.


















