Team My Pune City –राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी काही दिवसांपूर्वी एक पत्रकार परिषदेत बनावट आधार कार्ड कसं बनवलं जातं आणि त्याचा खोट्या मतदार नोंदणीसाठी कसा उपयोग केला जातो याचा एक डेमो दाखवला होता.
यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी (Rohit Pawar)प्रतिक्रिया देतांना मी म्हणाले ,ते आधार कार्ड खोटं निघालं, आता रोहित पवार त्यावरून माफी मागणार आहेत का? . तसेच ते कार्ड कोणी काढलं यावर गुन्हा दाखल होत असल्याचंही फडणवीस म्हणाले. त्यानंतर आमदार रोहित पवारांनी पुन्हा एकदा एक्सवर पोस्ट शेअर करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिक्रियेला प्रत्युत्तर देत टीका केली आहे. एवढा रिकामा वेळ गृह विभागाकडे आहे का? आणि असेल तर फलटणमधील डॉक्टर तरुणी आत्महत्या प्रकरणासह राज्यातील अनेक घटनांवर गृह विभागाने चौकशी करण्यासाठी वेळ खर्च करावा असं रोहित पवारांनी म्हटलं आहे.
रोहित पवार म्हणाले ,आदरणीय फडणवीस साहेब, बोगस मतदार नोंदण्यासाठी बनावट आधार कार्ड कसं तयार केलं जातं याचा पत्रकार परिषदेत मी डेमो दाखवला. याची गृहविभागाने चौकशी केली आणि आधारकार्ड बनावट असल्याचं निष्पन्न झाल्याने गुन्हा दाखल करणार असल्याचं समजलं… आता यावर हसावं की रडावं हेच कळेना… जर मीच रेषतः डेमो देऊन आधारकार्ड बनावट असल्याचं सांगत असेल तर आधारकार्ड खरं की बनावट याची १५ दिवस चौकशी करण्याची मुळातच गरज काय होती?”, असं रोहित पवारांनी म्हटलं आहे.
MHADA : पुण्यातील म्हाडा गृहनिर्माण सोडतीला मुदतवाढ; अर्ज प्रक्रिया २१ नोव्हेंबरपर्यंत सुरू
एवढा रिकामा वेळ गृह विभागाकडे कसा आहे? असेलच तर फलटणमधील डॉक्टर तरुणी आत्महत्या प्रकरण, सोमनाथ सूर्यवंशी, महादेव मुंडे, संतोष देशमुख, महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रकरण यासह अशा कितीतरी घटना आहेत ज्यामधील SIT चौकशी किंवा पोलीस तपास पुढे सरकत नाही. अशा प्रकरणात गृह विभागाने चौकशी करण्यासाठी आपला वेळ खर्च करावा. आपण अभ्यासू नेते आहात आणि त्याचा कायमच आदर आहे, पण आज आपल्या सल्लागारांना समज देण्याची आणि गृहविभागाने रिकामटेकडेपणा सोडून कामावर लक्ष देण्याच्या सूचना देण्याची गरज आहे. आपण त्या द्याव्यात, ही विनंती”, असं रोहित पवारांनी म्हटलं आहे


















