Team My Pune City – पैशांच्या मोहातून धाराशिव येथील एका स्टील व्यावसायिकाकडील 40 लाखांची रोकड हिसकावण्याचा ( Robbery ) मित्रानेच आपल्या साथीदारांसमवेत रचलेला कट आंबेगाव पोलिसांनी 24 तासांच्या आत उघडकीस आणला. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून, एका विधिसंघर्षित बालकाला ताब्यात घेण्यात आले आहे.
याप्रकरणी आंबेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली होती. त्यानुसार पोलिसांनी तिघा अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आंबेगावमधील ( Robbery ) बाबजी पेट्रोल पंपासमोरील रस्त्यावर मंगळवारी (15 जुलै) सकाळी पावणेनऊच्या सुमारास तक्रारदार आणि त्यांचा मित्र रस्त्याने पायी चालत निघाले होते. त्या वेळी मित्राच्या खांद्यावर असलेली बॅग चोरट्यांनी पळवली. हा लुटीचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये बंदिस्त झाला होता.
तक्रारदार यांच्या आर्थिक उलाढालीबाबत मित्राला माहिती होती. पुण्यात आल्यानंतर तक्रारदार मित्राला सोबत घेऊनच आर्थिक व्यवहार करत असत. पुण्यातील बांधकाम व्यावसायिकांना पुरविलेल्या मालाचे पैसे जमा करण्यासाठी तक्रारदार ( Robbery ) बुधवारी (दि.16) रात्री पुण्याला निघणार असल्याचे त्यांच्या मित्राला माहिती होते. पैशांच्या मोहातून त्याने ही माहिती धाराशिव जिल्ह्यात राहणाऱ्या त्याच्या ओळखीच्या एका व्यक्तीला दिली. मित्र आणि इतर तिघांनी ही रोकड लुटण्याची योजना आखली. त्यासाठी पुण्यातून साथ देणाऱ्या साथीदाराने त्याचीच मोटार गुन्हा करण्यासाठी वापरली.
Talegaon Dabhade: रोटरी सिटी आयोजित शौर्य गौरव पुरस्कार समारंभ संपन्न!
रोकड हिसकावल्यानंतर आरोपीनी खेड, पाटस, जामखेड मार्गे धाराशिव जिल्हा गाठला. रोकड हिसकावताना पुण्यातील साथीदाराबरोबर आणखी दोघे होते. तक्रारदार गावातून निघाल्यापासून त्यांच्या वाहनाचा पाठलाग करण्यात ( Robbery ) आला. तक्रारदारांच्या ओळखीच्या विधिसंघर्षित बालकाने याबाबतची माहिती तक्रारदाराच्या मित्राला दिली. त्यानंतर मित्राने इतर दोघा आरोपींच्या संपर्कात राहून ही लूट केल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपींकडून 9 लाख 35 हजारांची रोकड, गुन्ह्यात वापरलेली मोटार आणि पाच मोबाइल संच जप्त करण्यात आले आहेत.
व्यावसायिकाच्या मित्रानेच आपल्या इतर साथीदारांसमवेत ही रोकड लुटली ( Robbery ) . आतापर्यंत पोलिसांनी दोघांना अटक केली आहे, तर एका विधिसंघर्षित बालकाला ताब्यात घेतले आहे. इतर काही आरोपी फरार असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
हडपसर गाडीतळ येथे सकाळी सहाच्या सुमारास तक्रारदार पोहोचल्यानंतर ते मित्राच्या मोटारीतून आंबेगाव परिसरात आले. रोकड असलेली बॅग खांद्यावर घेऊन मित्र चालत होता. त्या वेळी दुसऱ्या मोटारीतून आलेल्या चोरट्यांनी मित्राच्या खांद्यावरील बॅग हिसकावून पळ काढला. त्या वेळी तक्रारदाराने चालकाच्या दिशेने धावत जाऊन मोटारीची किल्ली काढण्याचा प्रयत्न केला. परंतु, चालकाने तोंडावर जोरात ठोसा मारल्याने तक्रारदार खाली पडले. त्यानंतर चोरटे फरार झाले. तक्रारदाराला मारहाण करणाऱ्या चोरट्यांनी त्यांच्या मित्राला हातदेखील लावला नाही, हे पोलिसांनी ( Robbery ) अचूक हेरले.