Team My Pune City – पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन व्यवहार प्रकरणावरुन ( Ravindra Dhangekar Vs Muralidhar Mohol) सुरू झालेल्या राजकीय आरोप-प्रत्यारोपानंतर रवींद्र धंगेकर यांनी पुन्हा एकदा मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर गंभीर आरोप करत राजकीय वातावरण तापवले आहे.
धंगेकर यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये असा दावा केला आहे की, पौडफाटा परिसरात हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवर मोहोळ यांच्या समर्थकांनी हल्ला केला. या हल्ल्यात महिलांनाही लक्ष्य करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. धंगेकर यांच्या म्हणण्यानुसार, भारतीय जनता पक्षाच्या अल्पसंख्याक मोर्चाच्या पदाधिकाऱ्याने पिस्तूल दाखवत वस्तीमध्ये घुसून काही व्यक्तींवर आणि महिलांवर हल्ला केला.
या प्रकरणात धंगेकर यांनी संबंधित व्यक्तीचा भाजपशी संबंध असल्याचेही नमूद केले असून, त्याचे फोटो आणि पत्र सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्यांनी या घटनेची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली ( Ravindra Dhangekar Vs Muralidhar Mohol) आहे.
दरम्यान, या आरोपांमुळे पुण्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले असून, या प्रकरणावर अधिकृत प्रतिक्रिया आणि पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले ( Ravindra Dhangekar Vs Muralidhar Mohol) आहे.


















