Team My Pune City –लग्नाचे आमिष दाखवून 22 वर्षीय तरुणीला रावेत (Ravet)येथील एका लॉजवर नेऊन तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केले. तरुणी गरोदर राहिली असता तिचा जबरदस्तीने गर्भपात केला. ही घटना मे 2023 ते एप्रिल 2025 या कालावधीत रावेत येथे घडली.
सनी करण चौधरी (रुपीनगर, पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी ठाणे येथील 22 वर्षीय तरुणीने रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
Pune: ‘दगडूशेठ’ गणपतीची भव्य रथातून थाटात आगमन मिरवणूक
Talegaon Dabhade: सरस्वतीच्या विद्यार्थ्यांनी बनवल्या पर्यावरण पूरक गणेश मूर्ती
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी आणि आरोपी सनी यांची सोशल मीडियावर ओळख झाली. सनी याने तरुणीला लग्नाचे आमिष दाखवले. सुरुवातीला ते कल्याण स्टेशन येथे भेटले. त्यानंतर त्याने तरुणीला रावेत येथील साईदिप लॉज येथे नेले. तिथे तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला. लॉजवर वारंवार नेऊन तिच्यावर लग्नाच्या आमिषाने अत्याचार करण्यात आला. दरम्यान तरुणी गरोदर राहिली. तिने सनी याच्याकडे लग्नासाठी विचारणा केली. त्यावेळी त्याने लग्नास नकार दिला. तरुणीला वाकड येथील एका हॉस्पिटल मध्ये नेऊन तिचा गर्भपात केला. त्यानंतर यमुनानगर येथील एका वकिलाच्या कार्यालयात नेऊन तरुणीच्या सही आणि अंगठ्याचे ठसे 500 रुपयांच्या स्टॅम्पवर घेतले. याबाबत तरुणीने पोलिसात तक्रार दिली. रावेत पोलीस तपास करीत आहेत.
सदर पीडितेने पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांचे आभार मानले तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक रावेत नितीन फटांगरे यांचे सुद्धा विशेष आभार मानले. पीडित ने पोलीस आयुक्त यांच्याशी संपर्क साधल्या नंतर त्वरित गुन्हा दाखल झाला असे आयुक्त शहराला लाभले त्याबद्दल सर्व सामान्य आयुक्तांचे अभिनंदन करता येत आहे.