Team MyPuneCity –बांधकाम साईटवर स्टॅक पार्किंग यंत्रणा बसवण्याचे आश्वासन देत तब्बल ३५ लाख २५ हजार रुपयांची रक्कम घेतल्यानंतर काम न करता फसवणूक केल्याचा प्रकार रावेत परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी दोन जणांविरुद्ध रावेत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
सचिन दिनदयाल अगरवाल (वय ४०, रा. आशिर्वाद, सेक्टर २९, प्लॉट नं. ८८, रावेत) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, आरोपी विक्रम मेहता (मालक, स्पार्टन इंजिनिअरिंग इंडस्ट्रीज प्रा. लि.) आणि प्रतिनीधी प्रणव डीओ (दोघेही रा. पुणे) यांनी सिटी वन पनाश बांधकाम प्रकल्पात ४७ स्टॅक पार्किंग यंत्रणा बसवण्याचे करार केले होते.
या कामासाठी फिर्यादी यांनी आरोपींना चेकद्वारे ३४ लाख ५८ हजार ७३० रुपये आणि टीडीएसच्या स्वरूपात ६६ हजार १७० रुपये, अशा एकूण ३५ लाख २५ हजार रुपयांची रक्कम दिली. मात्र, यंत्रणा पूर्ण बसवण्यात आली नाही. तसेच, वेळोवेळी आश्वासने देऊन काम प्रलंबित ठेवले गेले आणि पैसेही परत केले नाहीत.
Alandi:आळंदीतील वारकरी शिक्षण संस्थेत तरुणीवर अत्याचार; कीर्तनकार महिला व कुटुंबीयांसह पाच जणांविरुद्ध गुन्हा
Lohagad Fort: लोहगड किल्ल्यावर पुरातत्व विभाग, ग्रामस्थ व शिवप्रेमींचा जल्लोष ..
या प्रकरणी स्पार्टन इंजिनिअरिंग इंडस्ट्रीज प्रा. लि.चे प्रतिनिधी व मालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३१८ (४), ३१६ (२), ३ (५) अंतर्गत फसवणुकीचा गुन्हा रावेत पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक कुंभार करत आहेत.