Team My Pune City – खोट्या कागदपत्रांच्या आधारे एका फायनान्समधील लिलावातील फ्लॅट विक्रीस काढल्याचे भासवून एका निवृत्त शिक्षकाची तब्बल 27 लाख 50 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना फेब्रुवारी ते मार्च 2025 दरम्यान रावेत ( Ravet Crime News) परिसरात घडली.
लक्ष्मण विश्वनाथ रणवरे (वय 59, रा. अमरदीप कॉलनी, काळेवाडी) यांनी शुक्रवारी (दि. 11) रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आरोपी धनंजय खुशालचंद्र बोरा (रा. शिरूर), संजय शामराव रणवरे (रा. काळेवाडी) व अनिल रघुनाथ शेवाळे (रा. पुणे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल ( Ravet Crime News) केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रावेत येथील फ्लॅट लिलावात विकत घेतल्याचे खोटे सांगून तो फ्लॅट विक्रीचा बनाव रचला. आरोपींनी एका फायनान्सचा कर्मचारी असल्याचे भासवले. फिर्यादी यांच्याकडून 27 लाख 50 हजार रुपये घेऊन फसवणूक केली. रावेत पोलीस याबाबत अधिक तपास करीत ( Ravet Crime News) आहेत.