Team MyPuneCity – आजचे पंचांग. आजचा दिवस – रविवार. तारीख – ०४.०५.२०२५ (Rashi Bhavishya 4 May 2025). शुभाशुभ विचार – ७.०० प. चांगला दिवस.
आज विशेष- भानु सप्तमी.
राहू काळ – संध्याकाळी ४.३० ते ०६.००.
दिशा शूल – पश्चिमेस असेल.
आज नक्षत्र- पुष्य १२.५४ पर्यंत नंतर आश्लेषा.
चंद्र राशी – कर्क.
—————————-
मेष- (शुभ रंग- राखाडी) Rashi Bhavishya 4 May 2025
पारिवारिक सदस्यात सामंजस्याची भावना राहील. मुलांची अभ्यासातील गोडी वाढेल. आज तुमच्यासाठी गृह सौख्याचा दिवस. आईला दिलेला शब्द जरूर पाळा.
वृषभ (शुभ रंग- डाळिंबी)
राशीच्या तृतीय स्थानातून भ्रमण करणारा चंद्र तुमच्या पराक्रमात वृद्धी करणार आहे. आज तुम्ही चर्चेपेक्षा कृतीला प्राधान्य द्याल. भावंडांशी सलोखा वाढेल.
मिथुन (शुभ रंग – मोरपंखी)
अत्यंत उत्साहाने तुम्ही दिवसाची सुरुवात कराल. आर्थिक बाजू भक्कम असल्याने मनोबल उत्तम राहील. व्यवसायात काही पेच प्रसंगांना धैर्याने तोंड द्याल.
कर्क ( शुभ रंग- जांभळा)
आज तुम्ही एखादा विवाह जुळविण्यात यशस्वी मध्यस्थी कराल. महत्त्वाच्या चर्चेत आपले मत ठामपणे मांडाल. घाई गर्दीत घेतलेले निर्णय चुकतील.
सिंह ( शुभ रंग- लाल) Rashi Bhavishya 4 May 2025
भविष्यकाळाच्या दृष्टीने एखादी गुंतवणूक करण्याचा तुमचा विचार राहील. ज्येष्ठ मंडळी तीर्थयात्रा करतील. घरातील थोर मंडळी आपलंच करतील.
कन्या (शुभ रंग- आकाशी)
तुम्ही पूर्वी केलेली एखादी गुंतवणूक चांगला लाभ देईल. कार्यक्षेत्रात तुम्ही केलेले कष्ट कारणी लागतील. प्रमोशनचा मार्ग सोपा होईल. छान दिवस आहे.
तूळ (शुभ रंग- निळा)
योग्य आर्थिक नियोजन करून व केवळ चर्चेपेक्षा कृतीला प्राधान्य देऊन कार्यक्षेत्रात स्पर्धेला तोंड देता येईल. आज मित्र तुम्हाला चुकीचा मार्ग दाखवतील.
वृश्चिक ( शुभ रंग- चंदेरी)
नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांनी दिलेली आश्वासने फार मनावर घेण्याची गरज नाही. आज संध्याकाळी तुम्ही सत्संगाची वाट धरणे हिताचे राहील.
धनु (शुभ रंग- सोनेरी) Rashi Bhavishya 4 May 2025
नोकरीच्या ठिकाणी आज वरिष्ठांचे समाधान होणे शक्य नाही. आज गोडबोल्या मंडळींपासून दूरच रहा. विश्वासातली माणसेच विश्वासघात करतील. सतर्क रहा. प्रलोभने टाळा.
मकर (शुभ रंग- क्रीम)
आज तुमचे वैवाहिक जोडीदाराशी चांगले सूर जुळतील. धंद्यात भागीदारांबरोबर एकमत राहील. मोठे व्यावसायिक करार यशस्वी होतील. तुमच्यातील सकारात्मकता वाढेल.
कुंभ ( शुभ रंग- पिस्ता)
आज जे काही कराल ते तब्येतीला जपून करा. काही जुने आजार डोके वर काढण्याची शक्यता आहे. तज्ञ डॉक्टरांचा सल्ला वेळीच घेतलेला बरा.
मीन ( शुभ रंग – गुलाबी)
उच्चशिक्षित मंडळींच्या महत्त्वकांक्षा वाढतील. स्वतःच्या व्यक्तिमत्व विकासाकडे लक्ष द्याल. उच्च राहणी व उच्च विचारसरणी असे तुमचे आज धोरण असेल.
शुभम भवतु!
– जयंत कुलकर्णी
ज्योतिष व वास्तुशास्त्र सल्लागार
9689165424