Team MyPuneCity – आजचे पंचांग. ज्येष्ठ शुक्ल पंचमी, शके १९४७, वार – शनिवार. तारीख – ३१.०५.२०२५ (Rashi Bhavishya 31 May 2025). शुभाशुभ विचार – चांगला दिवस.
आज विशेष – साधारण दिवस.
राहू काळ – दुपारी ९.०० ते १०.३०.
दिशा शूल – पूर्वेला असेल.
आज नक्षत्र – पुष्य २१.०७ पर्यंत नंतर आश्लेषा. चंद्र राशी – कर्क.
मेष- (शुभ रंग- डाळिंबी) Rashi Bhavishya 31 May 2025
आज तुम्ही एखाद्या क्षुल्लक गोष्टीचा फारच विचार कराल. म्हणून हळवे करणारा एखादा प्रसंग घडेल. मुलांकडून तुमच्या अपेक्षा पूर्ण होतील. सामान्य दिवस.
वृषभ (शुभ रंग- जांभळा)
आज तुम्हाला एखाद्या सामाजिक कार्यात लक्ष घालावेसे वाटेल. आपल्या ओळखी इतरांच्या कामासाठी वापराल. प्रवासात नवीन नाती जुळतील.
मिथुन (शुभ रंग – निळा)
व्यवसायात लाभ होईल. आर्थिक स्थैर्य येईल. वाणीवर मात्र लगाम असू द्या. कुणालाही सल्ले देऊ नका. मिळकत चांगली असली तरी पैसा जपून वापरा.
कर्क ( शुभ रंग- लाल)
आज कुठेही आपलेच खरे करण्याचा अट्टाहास नसावा. इतरांचे म्हणणेही ऐकून घ्या. पूर्वी हरवलेली वस्तू पुन्हा शोधल्यास सापडण्याची शक्यता आहे.
Devendra Fadnavis: अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य तरुण पिढीला माहिती व्हावे-देवेंद्र फडणवीस
सिंह ( शुभ रंग- गुलाबी) Rashi Bhavishya 31 May 2025
आज राशीच्या व्ययस्थानी चंद्र असताना अनावश्यक खर्चाचे प्रमाण वाढेल. भिडस्तपणामुळे काही खर्च कराल. कायदा मोडण्याचे धाडस मात्र करू नका.
कन्या (शुभ रंग- स्ट्रॉबेरी)
आज तुमच्या राशीच्या लाभात असलेला चंद्र काहीतरी अनपेक्षित लाभ देणार आहे. आज तुम्ही योग्य निर्णय घ्याल व वेळेचे योग्य नियोजन कराल.
तूळ (शुभ रंग- पिस्ता)
नोकरदारांना जास्त वेळ थांबून कामे उरकावी लागतील. वरिष्ठ आज जेवढे विचारतील तेवढेच बोला. कौटुंबिक समस्यांकडे आज तुमचे दुर्लक्ष होईल.
वृश्चिक ( शुभ रंग- आकाशी)
उच्चशिक्षित असणाऱ्यांना आज विदेश गमनाच्या संधी खुणावतील. एखाद्या गुरु समान व्यक्तीचे मार्गदर्शन घ्याल. अध्यात्मिक मार्गाकडे झुकाल.
धनु (शुभ रंग- क्रीम) Rashi Bhavishya 31 May 2025
मोठ्या आर्थिक उलाढाली टाळा. चुकीच्या घेतलेल्या निर्णयातून एखादे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. गैरवर्तनाने प्रतिष्ठेला धोका संभवतो.
मकर (शुभ रंग- हिरवा)
कार्यक्षेत्रात गोड बोलून विरोधकांना आपले म्हणणे पटवता येईल. आज अतिआक्रमकता टाळायला हवी. घरात जोडीदाराबरोबरही सुसंवाद गरजेचा आहे.
कुंभ ( शुभ रंग- तांबूस)
मामा-मावशीकडून काही महत्त्वाचे समाचार येतील. येणी वसूल होतील. नोकरदारांवर कामाचा ताण खूप वाढणार आहे. तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका.
मीन ( शुभ रंग – पांढरा)
कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. आज काही जुन्या मित्रांसह गेट टुगेदर कराल. बरेच दिवसापासून प्रतीक्षेत असलेली प्रिय व्यक्ती आज संपर्कात येईल.
शुभम भवतु!
– जयंत कुलकर्णी
ज्योतिष व वास्तुशास्त्र सल्लागार.
9689165424