Team MyPuneCity – आजचे पंचांग. आजचा दिवस – बुधवार. तारीख – ३०.०४.२०२५ (Rashi Bhavishya 30 April 2025). शुभाशुभ विचार – शुभ दिवस.
आज विशेष- अक्षय्य तृतीया.
राहू काळ – दुपारी १२.०० ते ०१.३०.
दिशा शूल – उत्तरेस असेल.
आज नक्षत्र- रोहिणी १६.१८ पर्यंत नंतर मृग.
चंद्र राशी – वृषभ.
—————————-
मेष- (शुभ रंग- आकाशी) Rashi Bhavishya 30 April 2025
खर्च कितीही वाढला असला तरीही आर्थिक चणचण भासणार नाही. काही नवीन व्यावसायिक संधी चालून येतील. आज राजकीय नेते प्रभावी वक्तव्ये करतील.
वृषभ (शुभ रंग- राखाडी)
कार्यक्षेत्रात आज नवे हितसंबंध तयार होतील. उपवारांना सुयोग्य स्थळे सांगून येतील. एखादी हरवलेली वस्तू आज पुन्हा शोधली तर सापडू शकेल.
मिथुन (शुभ रंग – गुलाबी)
काही थकलेली बिले भरावी लागतील. बेरोजगारांना घरापासून दूरवर नोकरीच्या संधी येतील. आज तुम्ही भविष्यकाळा च्या दृष्टीने एखादी योग्य गुंतवणूक कराल.
कर्क ( शुभ रंग- डाळिंबी)
आज तुमच्यासाठी लाभाचा दिवस आहे. हौस मौज करण्यासाठी पुरेसा पैसा उपलब्ध होईल. आपल्याकडे मोठेपणा घेण्यासाठी तुम्ही काही खर्च कराल.
Special Editorial : मावळच्या मातीला समर्पित… एक नवे पर्व!
सिंह ( शुभ रंग- मोरपंखी) Rashi Bhavishya 30 April 2025
कार्यक्षेत्रात अविश्रांत कष्ट करण्याची तुमची तयारी असेल. ध्येयप्राप्तीच्या दिशेने तुम्ही यशस्वी वाटचाल कराल. आज तुमचे स्पर्धकही तुमचा हेवा करतील.
कन्या (शुभ रंग- पिस्ता)
नोकरदार नव्या नोकरीच्या संधीच्या शोधात असतील. जेष्ठ मंडळींची आज अध्यात्माकडे आवड वाढेल. तरुणांनी अति आक्रमकता टाळणे गरजेचे आहे.
तूळ (शुभ रंग- क्रीम)
कोणतेही गैरव्यवहार टाळा. आज कुसंगतीने प्रतिष्ठा धोक्यात येऊ शकते. सासुरवाडीकडून एखादा लाभ होण्याची शक्यता आहे. आज पत्नी जे म्हणेल त्याला हो म्हणा.
वृश्चिक ( शुभ रंग- चंदेरी)
भागीदारी मध्ये एखादा व्यवसाय सुरू करण्यासाठी चांगला दिवस आहे. नोकरीतही वरिष्ठ आज तुमच्या कामातील समर्पणाची दखल घेतील. आशादायी दिवस.
Alandi : माऊलींच्या सर्व लेकरांनी उत्सवामध्ये सहभागी व्हायला यावे – योगी निरंजन नाथ
धनु (शुभ रंग- जांभळा) Rashi Bhavishya 30 April 2025
मानसिक खच्चीकरण करणाऱ्या काही घटना घडतील. आरोग्याच्या काही तक्रारी डोके वर काढतील. आज जोडीदाराकडे आपले मन मोकळे करावेसे वाटेल.
मकर (शुभ रंग- सोनेरी)
तुमचे शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम असेल. आवडते छंद जोपासण्यासाठी पैसा खर्च कराल. आज प्रिय व्यक्तीला तुम्ही एखादी सरप्राईज गिफ्ट द्याल.
कुंभ ( शुभ रंग- स्ट्रॉबेरी)
कंटाळवाणा दिवस आहे. नोकरदारांना कामावर दांडी मारून मस्त घरी आराम करावसं वाटेल. गृहिणी आज गृह उद्योगातून चांगली कमाई करतील.
मीन ( शुभ रंग – पांढरा)
आज एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी तुमची भटकंती होईल. रिकामटेकड्या चर्चेतून वाद निर्माण होतील. अति हुशार मंडळींच्या सहवासात कमीच बोलणे हिताचे राहील.
शुभम भवतु!
– जयंत कुलकर्णी
ज्योतिष व वास्तुशास्त्र सल्लागार
9689165424