Team MyPuneCity – आजचे पंचांग. ज्येष्ठ शुक्ल तृतीया. शके १९४७. वार – गुरुवार. तारीख – २९.०५.२०२५ (Rashi Bhavishya 29 May 2025). शुभाशुभ विचार – उत्तम दिवस.
आज विशेष – साधारण दिवस.
राहू काळ – दुपारी १.३० ते ३.००.
दिशा शूल – दक्षिणेस असेल.
आज नक्षत्र – आर्द्रा २२.३९ पर्यंत नंतर पुनर्वसू. चंद्र राशी – मिथुन.
मेष- (शुभ रंग- क्रीम) Rashi Bhavishya 29 May 2025
आज तुमचा जास्त वेळ घराबाहेरच जाईल. काहीजणांना किरकोळ घर दुरुस्तीची कामे हाती घ्यावी लागतील. तुमची काही गुपिते उघड होतील, कमीच बोललेले बरे.
वृषभ (शुभ रंग- जांभळा)
आज तुम्ही आनंदी व सकारात्मक असाल. रुटीन कामातून थोडा मौजमजेसाठी वेळ काढाल. कुटुंबीयांना पुरेसा वेळ देऊन मुलांचीही हौस भागवाल.
मिथुन (शुभ रंग – सोनेरी)
मनाच्या लहरीपणाला आवर घालणे गरजेचे आहे. नोकरीच्या ठिकाणी सहकाऱ्यांशी मिळून मिसळून वागा. आपलेच खरे करण्याचा हट्ट धरू नका.
कर्क ( शुभ रंग- पिस्ता)
अनावश्यक खर्चावर ताबा असावा. वृद्धांनी तळपायांची काळजी घ्यावी. आज काही दूरचे नातलग संपर्कात येतील. देणे-घेणे लिखित स्वरूपात असू द्या.
सिंह ( शुभ रंग- पांढरा) Rashi Bhavishya 29 May 2025
आज चालून आलेल्या उत्तम संधींचा फायदा घ्या. कामाचे तास वाढवा. आज काही योग्य माणसे संपर्कात येतील. नकारात्मक लोकांशी संगत टाळावी.
कन्या (शुभ रंग- आकाशी)
नोकरदारांना कामातील चुका निस्तराव्या लागतील. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांचे दडपण जाणवेल. विश्वासू मित्रही विश्वासघात करतील. कुसंगती टाळा.
तूळ (शुभ रंग- चंदेरी)
आज व्यवसायाच्या दृष्टीने प्रतिकूल दिवस असताना मोठी आर्थिक गुंतवणूक नको. आपल्या मर्यादेत रहा. गैरव्यवहार तर नकोच. आज प्रयत्नांती परमेश्वर.
वृश्चिक ( शुभ रंग- निळा)
केवळ मोठेपणासाठी न झोपणाऱ्या जबाबदाऱ्या अंगावर घेऊच नका. आज ताकही फुंकून प्यावे, असा दिवस. आपल्या प्रतिष्ठेची काळजी घ्यावी.
Lahanu Kom : डाव्या चळवळीचा तारा निखळला! पालघरचे माजी खासदार कॉम्रेड लहानू कोम यांचे निधन
धनु (शुभ रंग- स्ट्रॉबेरी) Rashi Bhavishya 29 May 2025
व्यावसायिक आव्हाने पेलता येतील. भागीदारीत काही गैरसमज असतील तर ते सुसंवादाने मिटतील. वैवाहिक जीवनात संध्याकाळी गोडी गुलाबी राहील.
मकर (शुभ रंग- गुलाबी)
आजारी व्यक्तींनी पथ्य पाळावे. एखादा बरा झालेला आजार परत उलटण्याची शक्यता आहे. आज रखडलेली येणी मागितली तर वसूल होऊ शकतील.
कुंभ ( शुभ रंग- राखाडी)
आज उच्च राहणी व उच्च विचारसरणी असेच तुमचे धोरण असेल. शालेय उपयोगी वस्तूंचे व्यवसाय चांगले चालतील. मुले अभ्यासात एकाग्रता साधतील.
मीन ( शुभ रंग – मरून)
कलाकारांना कामासाठी भटकंती करावी लागेल. खेळाडूंना सराव वाढवावा लागणार आहे. गृहिणींना घरातील मोठ्यांचे मानपान सांभाळावे लागतील.
शुभम भवतु!
– जयंत कुलकर्णी
ज्योतिष व वास्तुशास्त्र सल्लागार.
9689165424