Team MyPuneCity – आजचे पंचांग. ज्येष्ठ शुक्ल द्वितीया. वार – बुधवार. तारीख – २८.०५.२०२५ (Rashi Bhavishya 28 May 2025). शुभाशुभ विचार – शुभ दिवस.
आज विशेष – साधारण दिवस.
राहू काळ – दुपारी १२.०० ते १.३०.
दिशा शूल – उत्तरेला असेल.
आज नक्षत्र – मृग. चंद्र राशी – वृषभ १३.३७ पर्यंत नंतर मिथुन.
मेष- (शुभ रंग- पिस्ता) Rashi Bhavishya 28 May 2025
सामाजिक कार्यकर्त्यांची समाजातील लोकप्रियता वाढेल. काही घरगुती कामे आज शेजाऱ्यांच्या मदतीने होतील. वाहन दुरुस्तीसाठी खर्च होईल.
वृषभ (शुभ रंग- सोनेरी)
खर्च जरी प्रमाणाबाहेर वाढला असला तरी आर्थिक चणचण भासणार नाही. राशीच्या द्वितीयातील चंद्र विविध मार्गाने धन दे. शेजारी रुसून बसतील.
मिथुन (शुभ रंग – राखाडी)
आज तुम्ही लहरीपणाने वागाल. आपली मते इतरांवर लादण्याचा प्रयत्न कराल. वयाने मोठ्या असलेल्यांचा मान राखा. इतरांचेही म्हणणे ऐकून घ्या.
कर्क ( शुभ रंग- क्रीम)
विदेशाशी संबंधित असलेले व्यवसाय चांगले चालतील. पासपोर्ट विजा संबंधित कामातील अडथळे दूर होतील. वृद्धांनी आज अति दगदग टाळलेली बरी.
Shankar Jagtap: लोकांना विश्वासात घेऊनच विकास आराखड्याला अंतिम रूप — शंकर जगताप
सिंह ( शुभ रंग- जांभळा) Rashi Bhavishya 28 May 2025
राशीच्या लाभातील चंद्र काही अनपेक्षित लाभ देणार आहे. पूर्वी केलेली एखादी गुंतवणूक लाभदायी ठरेल. आज सहजच घेतलेले निर्णयही योग्य ठरतील.
कन्या (शुभ रंग- गुलाबी)
राशीच्या कर्म स्थानात चंद्रभ्रमण सुरू असताना रिकामटेकड्या गप्पांसाठी अजिबात वेळ नसतो. वेळेचा सदुपयोग करूनच कार्यक्षेत्रात ध्येय गाठता येईल.
तूळ (शुभ रंग- स्ट्रॉबेरी)
अति आक्रमकतेने नुकसान होईल. स्पर्धकांना कमजोर समजू नका. प्रत्येक निर्णय विचारांती घ्यायला हवा. आज प्रामाणिक मेहनतीस मात्र दैवाची साथ शंभर टक्के राहील.
वृश्चिक ( शुभ रंग- आकाशी)
नवीन व्यावसायिकांनी झटपट लाभाचा मोह टाळावा. आज गैरवर्तनाने मानहानी होईल. वैवाहिक जीवनात आज माझं चुकलं ही भूमिका हिताची राहील.
धनु (शुभ रंग- चंदेरी) Rashi Bhavishya 28 May 2025
आज कार्यक्षेत्रात उत्तम संधी चालून येणार आहेत सकारात्मक दृष्टीकोन व त्वरित निर्णय गरजेचे आहेत. जोडीदाराकडून अपेक्षित असलेले सहकार्य मिळणारच आहे.
मकर (शुभ रंग- केशरी)
नोकरीच्या ठिकाणी कितीही राबला तरी वरिष्ठांचे समाधान अशक्य. नोकरदारांनी कामातील चुका टाळाव्यात. आज तब्येतीस प्राधान्य देणे गरजेचे.
कुंभ ( शुभ रंग- मोरपंखी)
नवीन नोकरीच्या शोधात असणाऱ्या नोकरदारांना नवीन संधी येतील. काहीजण आज काम थोडे बाजूला ठेवूनही हौस मौज करण्यास प्राधान्य देतील.
मीन ( शुभ रंग – डाळिंबी)
आज तुमच्यासाठी गृह सौख्याचा दिवस. मुलांचे अति लाड टाळून शिस्तीला प्राधान्य द्यावे. आज थोडे मुलांच्या अभ्यासात डोकावणे हिताचे राहील.
शुभम भवतु!
– जयंत कुलकर्णी
ज्योतिष व वास्तुशास्त्र सल्लागार.
9689165424