Team MyPuneCity : आजचे पंचांग. वैशाख- कृष्ण प्रतिपदा (८.३२ नंतर). वार – मंगळवार. तारीख – २७.०५.२०२५ (Rashi Bhavishya 27 May 2025). शुभाशुभ विचार – क्षय तिथी.
आज विशेष – करी दिन.
राहू काळ – दुपारी ३.०० ते ४.३०.
दिशा शूल – उत्तरेला असेल.
आज नक्षत्र – रोहिणी. चंद्र राशी – वृषभ.
मेष- (शुभ रंग- क्रीम) Rashi Bhavishya 27 May 2025
आज तुमची आर्थिक स्थिती भक्कम असेल विवाहेछूकांना उत्तम स्थळांचे प्रस्ताव येतील. तुमच्या स्पष्टवक्तेपणा मुळे जवळच्या नात्यात काही गैरसमज होतील.
वृषभ (शुभ रंग- पिस्ता)
आज तुमच्यासाठी पूर्णपणे अनुकूल दिवस असून व्यावसायिक अडचणी दूर होतील. आज जमाखर्चाचा तराजू समतोल राहील. विरोधकांची पीछेहाट होईल.
मिथुन (शुभ रंग – गुलाबी)
आज कंजूषणाला लगाम घालून काही अत्यावश्यक खर्च करावेच लागणार आहेत. पासपोर्ट विजा संबंधित कामात काही अडचणी असतील तर दूर होतील.
कर्क ( शुभ रंग- राखाडी)
आज राशीच्या लाभातून चंद्रभ्रमण होत असताना उद्योग व्यवसायात काही मनासारख्या घटना घडतील. महत्त्वाची कामे वेळे आधीच विना व्यत्यय पार पडतील.
सिंह ( शुभ रंग- आकाशी) Rashi Bhavishya 27 May 2025
राशीच्या दशम स्थानी चंद्रभ्रमण सुरू असताना आळस झटकून कामाला लागावे लागते. आज रिकाम्या गप्पा टाळून तुम्ही कर्तव्यास प्राधान्य द्याल. व्यस्त दिवस.
कन्या (शुभ रंग- जांभळा)
राशीच्या भाग्यात चंद्रभ्रमण सुरू असताना तुमच्यासाठी प्रसन्न दिवस आहे. आध्यात्मिक उन्नती कडे पावले वळतील. आज सज्जनांचा सहवास लाभेल.
तूळ (शुभ रंग- केशरी)
आज स्वतःच्या सुरक्षिततेला प्राधान्य देणे गरजेचे आहे. कोणतीही धाडसाची कामे आज टाळावीत. व्यवसायात सुद्धा मोठे आर्थिक धाडस नको. आज जोडीदारास लाभ संभवतो.
वृश्चिक ( शुभ रंग- स्ट्रॉबेरी)
कार्यक्षेत्रात वाढती स्पर्धा तुम्हाला बेचैन करेल. इतरांच्या विचारांशी जमवून घेणे अवघड जाईल. वैवाहिक जीवनात जोडीदाराच्या मतास प्राधान्य देणे हिताचे राहील.
छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्योजकाच्या घरी दरोडा टाकणाऱ्याचा पोलिसांकडून एन्काऊंटर
धनु (शुभ रंग- निळा) Rashi Bhavishya 27 May 2025
ज्येष्ठ मंडळींना आज काही आरोग्य विषयक चाचण्या करून घ्याव्या लागतील. नोकरदार वरिष्ठांच्या दडपणात असतील. दुकानदारांची उधारी वसूल होईल.
मकर (शुभ रंग- मोरपंखी)
काही रसिक मंडळी आज काम बाजूला ठेवूनही मौज मजेला प्राधान्य देतील. व्यक्तिमत्व विकासावर आज तुम्ही भर द्याल. उंची राहणीमानाकडे तुमचा कल असेल.
कुंभ ( शुभ रंग- सोनेरी)
राशीच्या चतुर्थात चंद्रभ्रमण होत असताना तुमच्या कौटुंबिक सुखात वृद्धी होईल. मुले तुमच्या अपेक्षा पूर्ण करतील. आज आईच्या शब्दाला मान द्या.
मीन ( शुभ रंग – चंदेरी)
एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी भटकंती होईल. काही अति हुशार मंडळींच्या सहवासात मौन बाळगणेच हिताचे राहील. विद्यार्थी अभ्यासात चालढकल करतील.
शुभम भवतु!
– जयंत कुलकर्णी
ज्योतिष व वास्तुशास्त्र सल्लागार.
9689165424