Team MyPuneCity – आजचे पंचांग. वैशाख कृष्ण १४, शके १९४७. सोमवार. तारीख – २६.०५.२०२५ (Rashi Bhavishya 26 May 2025). शुभाशुभ विचार – अमावास्या वर्ज्य.
आज विशेष – शनैश्चर जयंती.
राहू काळ – संध्याकाळी ७.३० ते ९.००.
दिशा शूल – पूर्वेस असेल.
आज नक्षत्र – भरणी ८.२४ पर्यंत नंतर कृत्तिका. चंद्र राशी – मेष १३.४१ पर्यंत नंतर वृषभ.
मेष- (शुभ रंग- पिस्ता) Rashi Bhavishya 26 May 2025
कार्यक्षेत्रात अनुकूल वातावरण असेल. नोकरदारांना वरिष्ठांचे पूर्ण सहकार्य असेल. आज अधिकारांचा गैरवापर मात्र टाळा. कायद्यात राहणे हिताचे आहे.
वृषभ (शुभ रंग- क्रीम)
काही दूरची नाती संपर्कात येतील. जेष्ठ मंडळी तीर्थस्थानी पर्यटनाचा आनंद घेतील. एखादी हरवलेली वस्तू संध्याकाळी परत शोधा म्हणजे सापडेल.
मिथुन (शुभ रंग – राखाडी)
काही अनुकूल घटना तुमचा कार्य उत्साह वाढवतील. तुमच्या मानसन्मानात वृद्धी होईल. प्रतिष्ठांच्या सहवासात तुमच्या महत्त्वकांक्षा वाढतील.
कर्क ( शुभ रंग- गुलाबी)
कोणतेही नवे उपक्रम हाती घेण्यासाठी आज योग्य दिवस. तरुणांच्या महत्त्वकांक्षा वाढणार आहेत. आज व्यवसाय वृद्धीसाठी विविध संधी चालून येतील.
सिंह ( शुभ रंग- जांभळा) Rashi Bhavishya 26 May 2025
नवीन व्यावसायिकांनी मर्यादे बाहेर आर्थिक धाडस करू नये. व्यवसायात जाहिरात वाढवावी लागेल. भिडस्त पणाला रामराम ठोकावा लागेल.
कन्या (शुभ रंग- आकाशी)
आज कोणतेही धाडस टाळाच. मोठ्या रकमेची ने आण करताना सावध राहायला हवे. विवाह जुळवणे विषयी चर्चा उद्यावरच ढकला. प्रतिकूल दिवस आहे.
तूळ (शुभ रंग- स्ट्रॉबेरी)
आज महत्त्वाच्या चर्चा व वाटाघाटी यशस्वी होतील. तुमच्या वक्तृत्वाचा समोरील व्यक्तीवर सकारात्मक प्रभाव राहील. जोडीदाराला दिलेला शब्द पाळाल.
वृश्चिक ( शुभ रंग- केशरी)
कार्यक्षेत्रात प्रामाणिक मेहनतीचे फळ मिळेल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांना तुमची मते पटू लागतील. आज संध्याकाळी तुम्हाला थोडा थकवा जाणवेल.
बारामती पट्ट्यात ढगफुटीसारखा पाऊस, कालवा फुटला, नद्यांना पूर, घराघरांत पाणी; दौंड-इंदापूरलाही झोडपले
धनु (शुभ रंग- चंदेरी) Rashi Bhavishya 26 May 2025
नेहमीच्या त्याच त्याच कामाचा कंटाळा येईल. आज काही रसिक मंडळी कर्मणुकीच्या कार्यक्रमाचा आस्वाद घेतील. फॅशनेबल वस्त्र खरेदी कराल.
मकर (शुभ रंग- सोनेरी)
तुमच्या कौटुंबिक सुखात वृद्धीच होईल. मुलांची अभ्यासातील कामगिरी समाधानकारक असेल. आज कुटुंबीयांच्या वाढत्या गरजा तुम्ही हौशीने पुरवाल.
कुंभ ( शुभ रंग- मोरपंखी)
आज तुम्हाला काही कामानिमित्त जास्त वेळ घराबाहेर राहावे लागणार आहे. काही अप्रिय माणसांचा सहवास सहन करावा लागेल. आज कमीच बोलणे हिताचे.
मीन ( शुभ रंग – मरून)
राशीच्या धनस्थानातून भ्रमण करणारा चंद्र आर्थिक बाजू भक्कम ठेवेल. आज फक्त शब्द हे शस्त्र आहे याचे भान असूद्या. अन्यथा काही नाती दुरावतील.
शुभम भवतु!
– जयंत कुलकर्णी
ज्योतिष व वास्तुशास्त्र सल्लागार
9689165424