Team MyPuneCity – आजचे पंचांग. वैशाख कृष्ण १२. वार – शनिवार. तारीख – २४.०५.२०२५ (Rashi Bhavishya 24 May 2025). शुभाशुभ विचार – १९ प. चांगला दिवस.
आज विशेष – शनि प्रदोष.
राहू काळ – सकाळी ९.०० ते १०.३०.
दिशा शूल – पूर्वेस असेल.
आज नक्षत्र – १३.४८ पर्यंत रेवती नंतर अश्विनी. चंद्र राशी – मीन १३.४८ पर्यंत नंतर मेष.
मेष- (शुभ रंग- क्रीम) Rashi Bhavishya 24 May 2025
कौटुंबिक गरजा वाढणार आहेत. काही खर्च भिडस्तपणा पायी करावेच लागणार आहेत. गृहिणींना रितीरिवाज सांभाळावे लागतील. मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या.
वृषभ (शुभ रंग- राखाडी)
आज घर खरेदी किंवा वाहन खरेदीच्या कामासाठी कर्ज मंजुरी होऊ शकेल. आज दुपारनंतर लाभातील चंद्रभ्रमण काही अनपेक्षित लाभ देईल.
मिथुन (शुभ रंग – निळा)
ध्येय साध्य करण्यासाठी अथक प्रयत्नांशिवाय कोणताही शॉर्टकट नाही. आज तुम्ही आपल्या कर्तव्याला प्राधान्य द्याल. अधिकाराचा गैरवापर करू नका.
कर्क ( शुभ रंग- पिस्ता)
आज तुम्हाला आध्यात्मिक विषयात गोडी वाटेल. उच्चशिक्षित मंडळींना विदेश गमनाचे वेध लागतील. आज आजी-आजोबा नातवंडांचे हट्ट पुरवतील.
Ajit Pawar : वैष्णवी हगवणे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार – अजित पवार
सिंह ( शुभ रंग- गुलाबी) Rashi Bhavishya 24 May 2025
राशीच्या अष्टमातून चंद्र भ्रमण होत असताना कोणतेही धाडस टाळणे हिताचे. जे काही चालले ते बरं चाललंय समजा. आज जोडीदाराच्या मतानेच घ्या.
कन्या (शुभ रंग- स्ट्रॉबेरी)
गोडबोल्या मंडळींकडून आलेल्या प्रलोभनांना बळी पडू नका. जनांचे ऐकून मनाचेच करा. वैवाहिक जीवनात आज जोडीदाराकडे मनमोकळे करावेसे वाटेल.
तूळ (शुभ रंग- आकाशी)
आज दिवस कष्टांचा आहे. सहज काही मिळेल या भ्रमात राहू नका. आज तुमचे मनोबलही कमीच असेल महत्त्वाचे निर्णय घ्यायला उशीर करू नका.
वृश्चिक ( शुभ रंग- जांभळा)
कला क्रीडा क्षेत्रामध्ये असाल तर उत्तम संधी चालून येतील. कार्यक्षेत्रातील सुखद घटना तुमचा आत्मविश्वास वाढवतील. गृहिणी पार्लर साठी वेळ देतील.
भाजप नेत्याचं हायवेवरच खुल्लम खुल्ला सुरू; कारमधून उतरुन महिलेसोबत संबध, व्हिडिओ व्हायरल
धनु (शुभ रंग- पांढरा) Rashi Bhavishya 24 May 2025
आज काही घरगुती समस्यांवर लक्ष देणे तुम्हाला गरजेचे वाटेल. गृहिणींनी वेळात वेळ काढून आज मुलांच्या अभ्यासात डोकावणे हिताचे राहील.
मकर (शुभ रंग- मोरपंखी)
सामाजिक कार्यकर्त्यांचा समाजातील मान वाढेल. आज तुम्ही आपले अधिकार वापरून इतरांची कामे कराल. घरगुती समस्यांकडे तुमचे दुर्लक्ष होईल.
कुंभ ( शुभ रंग- डाळिंबी)
आज कार्यक्षेत्रात तुमचे वक्तृत्व कामी येईल. नोकरीत वरिष्ठ तुमच्या अडचणी समजून घेतील. आज शेजारी जरा तिरकस नजरेने बघतील. तुम्ही दुर्लक्ष करा.
मीन ( शुभ रंग – हिरवा)
प्रत्येक गोष्टीकडे आज तुम्ही सकारात्मकतेने पहाल. सहकारी तुमच्या प्रभावात असतील. नोकरीच्या ठिकाणी आज अधिकारी वर्गाकडून शाब्बासकी मिळेल.
शुभम भवतु!
– जयंत कुलकर्णी
ज्योतिष व वास्तुशास्त्र सल्लागार.
9689165424