Team MyPuneCity – आजचे पंचांग. वैशाख कृष्ण एकादशी, शके १९४७, वार – शुक्रवार. तारीख – २३.०५.२०२५ (Rashi Bhavishya 23 May 2025) शुभाशुभ विचार – उत्तम दिवस.
आज विशेष – अपरा एकादशी.
राहू काळ – सकाळी १०.३० ते १२.००.
दिशा शूल – पश्चिमेस असेल.
आज नक्षत्र – १६.०२ पर्यंत उत्तरा भाद्रपदा, नंतर रेवती. चंद्र राशी – मीन.
मेष- (शुभ रंग- मोतिया) Rashi Bhavishya 23 May 2025
आज जमाखर्चाचा तराजू डळमळीत होणार आहे. काही जणांना तातडीचे प्रवास घडतील. घरात वडीलधाऱ्या मंडळींशी काही सौम्य मतभेद होऊ शकतात.
वृषभ (शुभ रंग- मरून)
आज राशीच्या लाभातील चंद्र तुमच्या काही अपुऱ्या स्वप्नांची पूर्ती करेल. पैशा अभावी रखडलेली कामे हाती घेता येतील. संततीचे विवाह योग जुळतील.
मिथुन (शुभ रंग – मोतिया)
उद्योग धंद्यातील वाढत्या स्पर्धेला समर्थपणे तोंड द्याल. नोकरदारांवर वरिष्ठ वाढीव जबाबदाऱ्या सोपवतील. आज तुम्हाला कुटुंबीयांना वेळ देणे अवघड जाईल.
कर्क ( शुभ रंग- भगवा)
आज तुमची आध्यात्मिक मार्गाकडे रुची वाढेल. काही नास्तिक मंडळी ही आज मंदिराच्या रांगेत निमुटपणे उभी राहतील. संध्याकाळी एखादा सत्संग घडेल.
Vaishnavi Hagwane : वैष्णवी हगवाणे यांचे बाळ त्यांच्या आई वडिलांकडे सुपूर्द
सिंह ( शुभ रंग- मोरपंखी) Rashi Bhavishya 23 May 2025
जे आपले काम नाही त्यात उगीच वेळ वाया घालवू नका. धाडसाची कामे तर आज टाळाच. नाकासमोर चालणे हिताचे राहणार आहे. आज जोडीदाराच्या चुका काढू नका.
कन्या (शुभ रंग- केशरी)
अति उत्साहात घेतलेले निर्णय चुकण्याची शक्यता आहे. अति आक्रमकता टाळावी. अडचणीच्या प्रसंगी तुम्हाला आज जोडीदारच योग्य सल्ले देऊ शकेल.
तूळ (शुभ रंग- डाळिंबी)
आज खर्चाचे प्रमाण आवाक्या बाहेर जाणार आहे. महत्त्वाचे निर्णय घेताना द्विधा मनस्थिती होईल. प्रवासात आरोग्य बिघडेल काळजी घ्या.
वृश्चिक ( शुभ रंग- धनु)
सौंदर्यप्रसाधनांचे व्यवसाय तेजीत चालतील. मौल्यवान वस्तूंची खरेदी कराल. नोकरदार मंडळी नोकरीत बदल करण्यासाठी उत्सुक असतील.
Dudulgaon Water Logging : डुडूळगावात अवकाळी पावसाने रस्ते जलमय; नागरिकांची पालिकेकडे तक्रार
धनु (शुभ रंग- चंदेरी) Rashi Bhavishya 23 May 2025
वास्तु व वाहन खरेदीच्या कामातील अडथळे दूर होतील. घरात सज्जनांची येजा राहील. उच्च शिक्षण घेणाऱ्यांना परिश्रम वाढवावे लागणार आहेत.
मकर (शुभ रंग- निळा)
महत्त्वाच्या कामासाठी आज तुमची भटकंती होणार आहे. प्रवासात झालेल्या नव्या ओळखींचे मैत्रीत रूपांतर होईल. तुमची सकारात्मकता वाढेल. आशादायी दिवस.
कुंभ ( शुभ रंग- लाल)
आर्थिक परिस्थिती उत्तम असल्याने तुमची मनस्थिती ही उत्तम असेल. प्रभावी वक्तृत्वाने आज तुम्ही विरोधकांनाही आपलेसे कराल. शब्द जपून वापरा.
मीन ( शुभ रंग – सोनेरी)
आज कुठेही आपलेच खरे करण्याचा तुमचा हट्ट असेल. इतरांचेही म्हणणे समजून घेणे हिताचे राहील. आज न पेलणाऱ्या जबाबदाऱ्या अंगावर घेऊच नका.
शुभम भवतु!
– जयंत कुलकर्णी
ज्योतिष व वास्तुशास्त्र सल्लागार.
9689165424