Team MyPuneCity – आजचे पंचांग – वैशाख कृष्ण दशमी, शके १९४७, वार – गुरुवार. तारीख – २२.०५.२०२५ (Rashi Bhavishya 22 May 2025). शुभाशुभ विचार – १४ प. चांगला.
आज विशेष – साधारण दिवस.
राहू काळ – दुपारी ०१.३० ते ३.००.
दिशा शूल – दक्षिणेस असेल.
आज नक्षत्र – पूर्वा भाद्रपदा १७.४७ पर्यंत नंतर उत्तरा भाद्रपदा. चंद्र राशी – कुंभ १२.०८ पर्यंत नंतर मीन.
मेष- (शुभ रंग- गुलाबी) Rashi Bhavishya 22 May 2025
व्यवसायात जमाखर्चाचे गणित बिघडेल. बेरोजगारांची भ्रमंती चालूच राहणार आहे. घरात थोरांनी केलेले उपदेश ऐकून घ्यावे लागतील. आज कमीच बोललेले बरे.
वृषभ (शुभ रंग- निळा)
धंद्यातील येणी वसूल झाल्याने नवीन व्यावसायिकांचा उत्साह वाढेल. दुपारनंतर दिवस लाभाचा असल्याने जसे चिंताल तसे होईल. शुभच चिंता.
PCMC: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे कामकाज शंभर टक्के झाले डिजिटल
मिथुन (शुभ रंग – मोतिया)
उद्योग धंद्यातील वाढत्या स्पर्धेला समर्थपणे तोंड द्याल. नोकरदारांवर वरिष्ठ वाढीव जबाबदाऱ्या सोपवतील. आज तुम्हाला कुटुंबीयांना वेळ देणे अवघड जाईल.
कर्क ( शुभ रंग- जांभळा)
कोणत्याही क्षेत्रातील तुमच्या प्रामाणिक मेहनतीला दैवाची साथ मिळेल. ज्येष्ठ मंडळी सत्संगात रमतील. घरात एखादे धार्मिक कार्य करून घ्याल.
सिंह ( शुभ रंग- क्रीम) Rashi Bhavishya 22 May 2025
कार्यक्षेत्रातील तुमची व्यस्तता वाढेल. आज तुम्हाला पूर्वीच्या काही चुका निस्तराव्या लागतील. संध्याकाळी गाडी चालवताना वेगावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.
कन्या (शुभ रंग- पिस्ता)
कार्यक्षेत्रातील तुमचे वर्चस्व वाढेल. नव्या ओळखी व्यवसाय वृद्धीच्या कामी येतील. आज जोडीदाराला अभिमानास्पद वाटणारी कामगिरी तुमच्या हातून होईल.
तूळ (शुभ रंग- भगवा)
काही येणी असतील तर ती वसूल होण्यासाठी मागावि लागणार आहेत. आज तुमचे हितशत्रू ही मित्रांमध्येच लपून बसलेले असू शकतात. सतर्क राहावे लागेल.
वृश्चिक ( शुभ रंग- केशरी)
योग्य आर्थिक नियोजन व वेळेचा सदुपयोग करून ध्येयाकडे वेगाने वाटचाल कराल. उच्चशिक्षितांच्या अपेक्षा वाढतील. नवोदित कलाकारांना प्रसिद्धी मिळेल.
धनु (शुभ रंग- सोनेरी) Rashi Bhavishya 22 May 2025
मंदावलेले घरगुती उद्योग नव्याने कार्यरत करू शकाल. पारिवारिक सदस्यात एकजुटीची भावना राहील. कलाकार मंडळी निर्मात्यांकडे चकरा मारतील.
मकर (शुभ रंग- पांढरा)
आज तुम्हाला प्रत्येक कामात प्रचंड उत्साह राहील. तुमचा बराचसा वेळ घराबाहेर जाईल. मुले तर आज अभ्यासापेक्षा खेळातच जास्त रमतील.
कुंभ ( शुभ रंग- स्ट्रॉबेरी)
आज आवश्यक असलेला पैसा सहज उपलब्ध होईल. वाद विवादात आज तुमचीच सरशी होईल. तरीही नाती जपण्यासाठी आज कठोर शब्दप्रयोग टाळा.
मीन ( शुभ रंग – राखाडी)
आज तुम्ही कुठेही आपलीच मर्जी चालवण्याचा प्रयत्न कराल. कामाच्या ठिकाणी तुमच्या अंगी असलेल्या नेतृत्वगुणांना चांगला वाव मिळेल आज उत्साही दिवस.
शुभम भवतु!
– जयंत कुलकर्णी
ज्योतिष व वास्तुशास्त्र सल्लागार.
9689165424