Team MyPuneCity – आजचे पंचांग. वैशाख कृष्ण अष्टमी, वार – मंगळवार. तारीख – २०.०५.२०२५ (Rashi Bhavishya 20 May 2025). शुभाशुभ विचार – चांगला दिवस.
आज विशेष – कालाष्टमी.
राहू काळ – दुपारी ०३.०० ते ४.३०.
दिशा शूल – उत्तरेस असेल.
आज नक्षत्र – धनिष्ठा १९.३२ पर्यंत नंतर शततारका.
चंद्र राशी – मकर ७.२६ पर्यंत नंतर कुंभ.
मेष- (शुभ रंग- स्ट्रॉबेरी) Rashi Bhavishya 20 May 2025
आज तुमच्यासाठी लाभाचा दिवस आहे. कोणत्याही नव्या उपक्रमाची सुरुवात आज यशस्वीपणे करू शकता. मित्र आज दिलेली आश्वासने पाळतील.
वृषभ (शुभ रंग- मोरपंखी)
कोणतीही गोष्ट सहजच मिळेल या भ्रमात राहू नका. कष्टांचे फळ मात्र नक्कीच मिळेल. नकारात्मक मनोवृत्तीच्या मंडळींपासून दूर राहा. व्यर्थ वाद टाळा.
मिथुन (शुभ रंग – भगवा)
आज चंद्राचे भ्रमण राशीच्या भाग्यातून होत असताना ज्येष्ठांचा देवधर्म व दान धर्मा कडे कल वाढेल. श्रद्धाळूना उपासनेची प्रचिती येईल. प्रसन्न वाटेल.
कर्क ( शुभ रंग- सोनेरी)
जे कळत नाही त्यात वेळ वाया घालवू नका. नोकरीच्या ठिकाणी आपल्या कामावरच लक्ष केंद्रित करा. न झोपणाऱ्या जबाबदाऱ्या वेळीच झटकून टाकणं हिताचे राहील.
Unseasonal Rain : पिंपरी-चिंचवडमध्ये संध्याकाळच्या अवकाळी पावसाने नागरिकांची तारांबळ
सिंह ( शुभ रंग- डाळिंबी) Rashi Bhavishya 20 May 2025
व्यवसायात चढाओढ वाढलेली असताना निर्णय घ्यायला विलंब करू नका. पूर्वीची चूक परत करू नका. वैवाहिक जीवनात जुने विषय उगाळू नका.
कन्या (शुभ रंग- स्ट्रॉबेरी)
कार्यक्षेत्रात हितशत्रूंचा जोर वाढलेला असताना क्षुल्लक चुका करून त्यांना आयती संधी देऊ नका. नोकरदराने फक्त वरिष्ठांच्या आज्ञा पाळाव्यात.
तूळ (शुभ रंग- गुलाबी)
कार्यक्षेत्रात एखादा नवीन विषय शिकण्याची संधी चालून येईल. नोकरदारांना त्याच त्याच कामाचा कंटाळा येईल. उच्चशिक्षित मंडळींच्या अपेक्षा वाढतील.
वृश्चिक ( शुभ रंग- राखाडी)
वास्तू किंवा वाहन खरेदीच्या कामातील अडथळे दूर होतील. आज काही आवडते पाहुणे घरी पाय धुळ झाडतील. विद्यार्थी आज पालकांच्या अपेक्षा पूर्ण करतील.
धनु (शुभ रंग- क्रीम) Rashi Bhavishya 20 May 2025
व्यवसायात स्पर्धकांना कमजोर समजू नका. आपल्या भावी योजना जाहीर करण्याची घाई करू नका. गृहिणीनी झाकली मूठ झाकलीच ठेवणे हिताचे.
मकर (शुभ रंग- पिस्ता)
आज तुमची आर्थिक परिस्थिती उत्तम असल्याने मनस्थिती उत्तम असेल. आज कुणाला सल्ले देण्यापेक्षा स्तुती करूनच नाती जपता येतील.
कुंभ ( शुभ रंग- निळा)
आज तुम्ही जरा हट्टीपणाने वागाल. इतरांशी जमवून घेणे अवघड जाईल. उगीच वाद ओढावून घ्याल. जोडीदाराकडे मन मोकळे करावेसे वाटेल.
मीन ( शुभ रंग – मरून)
कार्यालयीन कामासाठी तातडीचे प्रवास घडतील. इम्पोर्ट एक्स्पोर्टचे व्यवसाय तेजीत चालतील. वाढत्या खर्चात जमाखर्चाचा तराजू डळमळीत होईल.
शुभम भवतु!
– जयंत कुलकर्णी
ज्योतिष व वास्तुशास्त्र सल्लागार
9689165424