मावळ ऑनलाईन – आजचे पंचांग. आजचा दिवस – शुक्रवार. तारीख – ०२.०५.२०२५ (Rashi Bhavishya 2 May 2025). शुभाशुभ विचार – चांगला दिवस.
आज विशेष- श्री आद्य शंकराचार्य जयंती.
राहू काळ – सकाळी १०.३० ते १२.००.
दिशा शूल – पश्चिमेस असेल.
आज नक्षत्र- आर्द्रा १३.०४ पर्यंत नंतर पुनर्वसू.
चंद्र राशी – मिथुन.
—————————-
मेष- (शुभ रंग- राखाडी) Rashi Bhavishya 2 May 2025
सामाजिक कार्यकर्त्यांची समाजातील लोकप्रियता वाढेल. काही घरगुती कामे आज शेजाऱ्यांच्या मदतीने होतील. वाहन दुरुस्तीसाठी खर्च होऊ शकतो.
वृषभ (शुभ रंग- गुलाबी)
खर्च जरी मर्यादे बाहेर वाढला असला तरीही आर्थिक चणचण भासणार नाही. राशीच्या द्वितीयातील चंद्र विविध मार्गाने धन देईल. शेजारी आज जरा रुसून बसतील.
मिथुन (शुभ रंग – आकाशी)
आज तुम्ही लहरीपणाने वागाल. आपली मते इतरांवर लादण्याचा प्रयत्न कराल. वयाने मोठ्या असलेल्यांचा मान राखा इतरांचेही म्हणणे समजून घ्या.
कर्क ( शुभ रंग- मोतिया)
विदेशाशी संबंधित असलेले व्यवसाय चांगले चालतील. पासपोर्ट विजा संबंधित कामातील अडथळे दूर होतील. वृद्धांनी अति दगदग टाळावी.
Mogara Mahotsav : बनेश्वर महादेव मंदिरात चंदनउटी सोहळ्यानिमित्त मोगरा महोत्सव
सिंह ( शुभ रंग- जांभळा) Rashi Bhavishya 2 May 2025
राशीच्या लाभातील चंद्र काही अनपेक्षित लाभ देणार आहे. पूर्वी केलेली एखादी गुंतवणूक लाभदायी ठरेल. आज सहजच घेतलेले निर्णय योग्य ठरतील.
कन्या (शुभ रंग- मरून)
राशीच्या कर्म स्थानात चंद्रभ्रमण चालू असताना रिकामटेकड्या गप्पांना अजिबात वेळ नसतो. वेळेचा सदुपयोग करूनच कार्यक्षेत्रात प्रगतीपथावर राहता येईल.
तूळ (शुभ रंग- सोनेरी)
अति आक्रमकतेने नुकसान होईल. स्पर्धकांना कमजोर समजू नका. प्रत्येक निर्णय हा विचारांती घ्यायला हवा. तुमच्या प्रामाणिक मेहनतीस आज दैवाची साथ नक्कीच मिळेल.
वृश्चिक ( शुभ रंग- पांढरा)
नवीन व्यावसायिकांनी झटपट लाभाचा मोह टाळावा. आज गैरवर्तनाने मानहानी होईल. वैवाहिक जीवनात आज माझं चुकलं हेच धोरण हिताचे राहील.
Dolasnath Mandir : अक्षय्य तृतीयेनिमित्त डोळसनाथ महाराज मंदिरात चंदन उटी सोहळा उत्साहात साजरा
धनु (शुभ रंग- क्रीम) Rashi Bhavishya 2 May 2025
आज कार्यक्षेत्रात उत्तम संधी चालून येणार आहेत. सकारात्मक दृष्टिकोन व त्वरित निर्णय गरजेचे आहेत. जोडीदाराकडून अपेक्षित असलेले सहकार्य मिळणारच आहे.
मकर (शुभ रंग- निळा)
नोकरीच्या ठिकाणी कितीही राबला तरी वरिष्ठांचे समाधान अशक्य. नोकरदारांनी कामातील चुका टाळाव्यात. आज तब्येतीस प्राधान्य देणे गरजेचे आहे.
कुंभ ( शुभ रंग- पिस्ता)
नवीन नोकरीच्या शोधात असणाऱ्या नोकरदारांना नव्या संधी येतील. काहीजण आज काम थोडे बाजूला ठेवूनही हौस मौज करण्यास प्राधान्य देतील.
मीन ( शुभ रंग – तांबडा)
आज तुमच्यासाठी गृह सौख्याचा दिवस. कामावर दांडी मारून मस्त आराम करावासा वाटेल. आज थोडं मुलांच्या पुस्तकात डोकावणे हिताचे राहील.
शुभम भवतु!
– जयंत कुलकर्णी
ज्योतिष व वास्तुशास्त्र सल्लागार
9689165424