Team MyPuneCity – आजचे पंचांग. वैशाख कृष्ण ६. शके १९४७. वार – रविवार, तारीख – १८.०५.२०२५ (Rashi Bhavishya 18 May 2025). शुभाशुभ विचार – वृद्धी तिथी.
आज विशेष – साधारण दिवस.
राहू काळ – सायंकाळी ०४.३० ते ६.००.
दिशा शूल – पश्चिमेस असेल.
आज नक्षत्र – उत्तराशाढा १८.५३ पर्यंत नंतर श्रवण. चंद्र राशी – मकर.
मेष- (शुभ रंग- आकाशी) Rashi Bhavishya 18 May 2025
नोकरदारांना कामातील चुका सुधाराव्या लागतील. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांचे दडपण जाणवेल. आज विश्वासू मित्र ही दगा देतील सतर्क रहा.
वृषभ (शुभ रंग- चंदेरी)
आज व्यवसायाच्या दृष्टीने प्रतिकूल दिवस असताना मोठी आर्थिक गुंतवणूक नको. आपल्या मर्यादेत रहा. गैर व्यवहार तर नकोच. आज प्रयत्नांती परमेश्वर.
मिथुन (शुभ रंग – निळा)
केवळ मोठेपणासाठी न झोपणाऱ्या जबाबदाऱ्या स्वीकारू नका. आज ताकही फुंकून त्यावे असा दिवस आहे. आपल्या प्रतिष्ठेची काळजी घ्यायला हवी.
कर्क ( शुभ रंग- स्ट्रॉबेरी)
मोठी व्यावसायिक आव्हाने पेलू शकाल. भागीदारीत काही गैरसमज असतील तर ते सुसंवादाने मिटतील. वैवाहिक जीवनात संध्याकाळी गोडी गुलाबी राहील.
Pune : पुणे ग्रामीणच्या एसपीपदी संदीपसिंह गिल यांची नियुक्ती; पंकज देशमुख यांच्याकडून घेतला कार्यभार
सिंह ( शुभ रंग- गुलाबी) Rashi Bhavishya 18 May 2025
आजारी व्यक्तींनी पथ्य पाळावे. एखादा बरा झालेला आजार परत उलटण्याची शक्यता आहे. रखडलेली येणी मागितली तर वसूल होऊ शकतील.
कन्या (शुभ रंग- राखाडी)
आज उच्च राहणी व उच्च विचारसरणी असे तुमचे धोरण असेल. शालेय उपयोगी वस्तूंचे व्यवसाय चांगले चालतील. मुले अभ्यासात एकाग्रता साधू शकतील.
तूळ (शुभ रंग- मरून)
कलाकारांना कामासाठी भटकंती करावी लागेल. खेळाडूंना सराव वाढवावा लागेल. गृहिणींना घरातील मोठ्यांचे मानपान जपावे लागतील.
वृश्चिक ( शुभ रंग- क्रीम)
कामानिमित्त जास्त वेळ घराबाहेरच राहाल. काहींना किरकोळ घर दुरुस्तीची कामे हाती घ्यावी लागतील. तुमची काही गुपिते उघड होण्याची शक्यता आहे. आज कमीच बोला.
धनु (शुभ रंग- जांभळा) Rashi Bhavishya 18 May 2025
आज तुम्ही आनंदी व सकारात्मक असाल. रुटीन कामातून थोडा मौजमजेसाठी वेळ काढाल. कुटुंबीयांना पुरेसा वेळ देऊन मुलांचेही लाड पुरवाल.
मकर (शुभ रंग- सोनेरी)
मनाच्या लहरीपणाला आवर घालणे गरजेचे आहे. नोकरीच्या ठिकाणी सहकाऱ्यांशी मिळून मिसळून वागणे हिताचे राहील. आपलेच खरे करण्याचा अट्टाहास करू नका.
कुंभ ( शुभ रंग- पिस्ता)
आज काही दूरचे नातलग संपर्कात येतील. देणी घेणी लिखित स्वरूपात असू द्यात. वृद्धांनी तळपायाची काळजी घ्यावी. अनावश्यक खर्चावर ताबा असावा.
मीन ( शुभ रंग – पांढरा)
आज चालून आलेल्या उत्तम संधींचा फायदा घ्या. कामाचे तास वाढवा. आज काही योग्य माणसे संपर्कात येतील. नकारात्मक लोकांशी संगत टाळावी.
शुभम भवतु!
– जयंत कुलकर्णी
ज्योतिष व वास्तुशास्त्र सल्लागार
9689165424