Team MyPuneCity – आजचे पंचांग – वैशाख कृष्ण ५, शके १९४७. वार – शनिवार. तारीख – १७.०५.२०२५ (Rashi Bhavishya 17 May 2025). शुभाशुभ विचार – चांगला दिवस.
आज विशेष – साधारण दिवस.
राहू काळ – सकाळी ०९.०० ते १०.३०.
दिशा शूल – पूर्वेस असेल.
आज नक्षत्र – पूर्वाशाढा १७.४४ पर्यंत नंतर उत्तराशाढा. चंद्र राशी – धनु.
मेष- (शुभ रंग- क्रीम) Rashi Bhavishya 17 May 2025
व्यवसायात काही आकस्मिक अडचणींचा सामना तुम्ही यशस्वीपणे कराल. घरात वडीलधारी मंडळी काहीशी हट्टीपणाने वागतील. प्रयत्नांना दैवाचे पाठबळ राहील.
वृषभ (शुभ रंग- जांभळा)
राशीच्या अष्टमातून चंद्रभ्रमण होत असताना आपल्या मर्यादित राहिलेले बरे. नवीन व्यवसायाची सुरुवात आज नकोच. जोडीदाराला धनलाभ होईल.
मिथुन (शुभ रंग – गुलाबी)
आज विविध मार्गाने धन येईल. कार्यक्षेत्रात यशाचा मार्ग प्रशस्त होईल. आज वेळेचे योग्य नियोजन मात्र गरजेचे आहे. वैवाहिक जीवनात गोडवा वाढेल.
कर्क ( शुभ रंग- निळा)
ज्येष्ठ मंडळींनी तब्येतीस जपावे. काही जुने आजार डोके वर काढण्याची शक्यता आहे. खाण्या पिण्यावर ताबा ठेवा. काही येणी अचानक वसूल होतील.
MP Shrirang Barne : चिंचवड, आकुर्डी, देहूरोड व तळेगाव दाभाडे रेल्वे स्टेशनच्या कामाला गती द्या
सिंह ( शुभ रंग- केशरी) Rashi Bhavishya 17 May 2025
आधुनिक विचारसरणी असलेले लोक आज संपर्कात येतील. आज तुम्ही व्यक्तिमत्व विकासावर भर द्याल. आवडते छंद जपण्यासाठी वेळ काढाल.
कन्या (शुभ रंग- मरून)
वर्क फ्रॉम होम करणाऱ्यांवर कामाचा ताण वाढणार आहे. गृह उद्योग करणाऱ्या महिलांची मिळकत वाढेल. जागेचे व्यवहार करण्यासाठी आज दिवस चांगला आहे.
तूळ (शुभ रंग- स्ट्रॉबेरी)
हाती असलेला पैसा खर्च करण्याचे विविध मार्ग सुचतील. मोठ्या मनाने आज तुम्ही गरजूंना मदतीचा हात द्याल. आज तुमचा जास्त वेळ घराबाहेर जाणार आहे.
वृश्चिक ( शुभ रंग- चंदेरी)
आज राशीच्या धनस्थानी चंद्रभ्रमण होत असताना आवश्यक पैसा सहज उपलब्ध होईल. आज वाणीवर लगाम गरजेचा आहे. नेते सभा गाजवतील.
Dehu Mishap : इंद्रायणी नदीत तेरा वर्षीय मुलगा बुडाला
धनु (शुभ रंग- मोतिया) Rashi Bhavishya 17 May 2025
आज तुम्ही एखाद्या क्षुल्लक गोष्टींचा फार विचार कराल. मन हळवे करणारा एखादा प्रसंग घडेल. महत्त्वाच्या चर्चेत आज फक्त ऐकण्याचे काम करा.
मकर (शुभ रंग- आकाशी)
आज दिवस खर्चाचा असताना बिनधास्त खर्च करा. गृहिणींना पूर्वीची बचत कामी येईल. बेरोजगारांना घरापासून दूर रोजगाराच्या संधी येतील.
कुंभ ( शुभ रंग- सोनेरी)
आज दिवस लाभाचा असल्याने तुमच्या काही अपुऱ्या इच्छा पूर्ण होतील. आज आपला मोठेपणा जपण्यासाठी उदार मनाने तुम्ही खर्च कराल.
मीन ( शुभ रंग – पांढरा)
उद्योग व्यवसायाच्या दृष्टीने आज अनुकूल दिवस. नवीन व्यावसायिकांच्या अथक प्रयत्नांना यश येईल. कार्यक्षेत्रात यश जवळच आल्याची
जाणीव होईल.
शुभम भवतु!
– जयंत कुलकर्णी
ज्योतिष व वास्तुशास्त्र सल्लागार
9689165424