Team MyPuneCity – आजचे पंचांग – वैशाख शुक्ल १४. वार – रविवार. तारीख – ११.०५.२०२५. शुभाशुभ विचार – व्यतिपात वर्ज्य.
आज विशेष- श्री नृसिंह जयंती.
राहू काळ – सायंकाळी ४.३० ते ०६.००.
दिशा शूल – पश्चिमेस असेल.
आज नक्षत्र – स्वाती .
चंद्र राशी – तूळ.
—————————-
मेष- (शुभ रंग- स्ट्रॉबेरी) Rashi Bhavishya 11 May 2025
गोडबोल्या मंडळींकडून आलेल्या प्रलोभनांना बळी पडू नका. जनाचे ऐकून मनाचेच करा. वैवाहिक जीवनात आज जोडीदाराकडे मन मोकळे करावेसे वाटेल.
वृषभ (शुभ रंग- जांभळा)
आज दिवस कष्टांचा सहज काही मिळेल या भ्रमात राहू नका. आज तुमचे मनोबलही कमीच असेल. महत्त्वाचे निर्णय घेण्यास उशीर करू नका.
मिथुन (शुभ रंग – मरून)
कला क्रीडा क्षेत्रात असाल तर उत्तम संधी चालून येतील. कार्यक्षेत्रातील काही सुखद घटना तुमचा आत्मविश्वास वाढवतील. गृहिणी पार्लर साठी वेळ देतील.
कर्क ( शुभ रंग- पांढरा)
आज काही घरगुती समस्यांवर लक्ष देणे तुम्हाला गरजेचे वाटेल. गृहिणींनी वेळात वेळ काढून आज मुलांच्या अभ्यासात डोकावणे हिताचे राहील.
सिंह ( शुभ रंग- मोरपंखी) Rashi Bhavishya 11 May 2025
सामाजिक कार्यकर्त्यांचा समाजातील मान वाढेल. आज तुम्ही आपले अधिकार वापरून इतरांची कामे कराल. घरगुती समस्यांकडे तुमचे दुर्लक्ष होईल.
कन्या (शुभ रंग- डाळिंबी)
आज कार्यक्षेत्रात तुमचे वक्तृत्व कामी येईल. नोकरीत वरिष्ठ तुमच्या अडचणी समजून घेतील. आज शेजारी जरा तिरकस नजरेने बघतील, तुम्ही दुर्लक्ष करा.
तूळ (शुभ रंग- हिरवा)
प्रत्येक गोष्टीकडे आज तुम्ही सकारात्मकतेने पाहाल. नोकरीच्या ठिकाणी आज अधिकाऱ्यांची शाब्बासकी मिळवाल. सहकारी तुमच्या प्रभावात असतील.
वृश्चिक ( शुभ रंग- क्रीम)
कौटुंबिक गरजा वाढणार आहेत. काही खर्च भिडस्तपणा पायी करावेच लागतील. गृहिणींना रीती रिवाज सांभाळावे लागतील. मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या.
धनु (शुभ रंग- राखाडी) Rashi Bhavishya 11 May 2025
आज घर खरेदी किंवा वाहन खरेदीच्या कामासाठी कर्ज मंजुरी होऊ शकेल. आज राशीच्या लाभातील चंद्र भ्रमण काही अनपेक्षित लाभ देईल.
मकर (शुभ रंग- निळा)
ध्येय साध्य करण्यासाठी अथक प्रयत्नांशिवाय कोणताही शॉर्टकट नाही. फक्त आपल्या कर्तव्याला प्राधान्य द्यायला हवे. अधिकारांचा गैरवापर नको.
कुंभ ( शुभ रंग- पिस्ता)
आज तुम्हाला आध्यात्मिक विषयात गोडी वाटेल. उच्चशिक्षित मंडळींना विदेश गमनाचे वेध लागतील आज आजी आजोबा नातवंडांचे हट्ट पुरवतील.
मीन ( शुभ रंग – गुलाबी)
राशीच्या अष्टमातून चंद्रभ्रमण होत असताना कोणतेही धाडस टाळणे हिताचे राहील. जे काही चाललय ते बरं चाललंय असंच समजा. जोडीदाराच्या मताने घ्यायला हवे.
शुभम भवतु!
– जयंत कुलकर्णी
ज्योतिष व वास्तुशास्त्र सल्लागार
9689165424