Team My Pune City – पुणे शहरातील एका बांधकाम ( Ransom) व्यावसायिकाला कुख्यात गुंड अरुण गवळी टोळीच्या नावाने पाच कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्या चौघांना पोलिसांनी विमाननगर येथील हॉटेलमधून सापळा रचून अटक केली. लष्कर पोलीस ठाणे आणि गुन्हे शाखेच्या संयुक्त पथकाने मंगळवारी ही धडाकेबाज कारवाई केली.
रोहन गवारे (30, रा. शीतल अपार्टमेंट, कवडेवाडी, कोरेगाव पार्क), सुदर्शन गायके (27, रा. महादेव मंदिरासमोर, वाळुंज, संभाजीनगर), महेंद्र शेळके (42, रा. शाहुनाथनगर, जि. बीड) आणि कृष्णा बुधनर (26, रा. हनुमान मंदिराजवळ, खामगाव, जि. बीड) अशी अटक आरोपींची नावे( Ransom) आहेत. या प्रकरणी पीडित बांधकाम व्यावसायिकाने लष्कर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
Metro : निगडी ते चाकण मेट्रो विस्ताराला गती; डीपीआर पीसीएमसीकडे सादर
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे मागील बारा वर्षांपासून ( Ransom) बांधकाम व्यवसायात कार्यरत आहेत. त्यांचा एक व्यावसायिक भागीदार असून, हॉटेल व्यवसायावरून त्यांच्यात वाद सुरू आहे. हे प्रकरण सध्या न्यायालयात प्रलंबित आहे. भागीदाराने व्यवसायासाठी आठ कोटी रुपये दिल्याचा दावा करत, ही रक्कम वैयक्तिक कामांसाठी वापरल्याचा आरोप तक्रारदारावर केला. याच वैमनस्यातून भागीदाराने अटक आरोपींशी संगनमत करून खंडणी उकळण्याचा कट रचला.
Talegaon Dabhade : तळेगाव दाभाडेमध्ये उद्या पाणी नाही!
आरोपींनी तक्रारदाराचा मोबाईल क्रमांक मिळवून एका ( Ransom) अनोळखी क्रमांकावरून संपर्क साधला. स्वतःला अरुण गवळीचा स्वीय सहाय्यक म्हणून सादर करत, सुरुवातीला सात कोटी रुपयांची खंडणी मागितली आणि नंतर तडजोड म्हणून पाच कोटी देण्याची धमकी दिली. त्यानंतर रक्कम घेण्यासाठी तक्रारदाराला विमाननगर येथील एका हॉटेलमध्ये बोलाविण्यात आले.याबाबतची माहिती मिळताच, लष्कर पोलीस ठाणे व गुन्हे शाखेच्या पथकाने हॉटेल परिसरात सापळा लावला. आरोपी खंडणी घेण्यासाठी येताच त्यांना रंगेहाथ पकडून ताब्यात घेण्यात आले.
ही कारवाई गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते, सहायक आयुक्त राजेंद्र मुळीक, संगीता अल्फान्सो यांच्या मार्गदर्शनाखाली लष्कर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीशकुमार दिघावकर, खंडणी विरोधी पथकाचे पोलिस निरीक्षक शैलेश संखे, तसेच गुन्हे शाखा युनिट चारचे पोलिस निरीक्षक अजय वाघमारे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पार पाडली. याप्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास सुरू ( Ransom) आहे.