Team MyPuneCity – पुण्याजवळच्या रांजणगाव खंडाळे परिसरात (Ranjangaon Crime) रविवारी सकाळी तीन अर्धवट जळालेल्या मृतदेह सापडून एकच खळबळ उडाली. मृतांमध्ये एका तरुणीचा आणि तिच्या दोन चिमुकल्या मुलांचा समावेश असल्याची माहिती पुढे आली आहे. या थरारक हत्याकांडाने संपूर्ण पुणे हादरले असून, आईसह दोघा बालकांना जिवंत जाळण्यात आले असण्याचा गंभीर संशय व्यक्त केला जात आहे.
ग्रोवेल कंपनीच्या मागील बाजूस, मुख्य महामार्गालगत सापडलेल्या या मृतदेहांमुळे परिसरात तणाव निर्माण झाला आहे. मृतांमध्ये एका २५ वर्षीय महिलेचा, चार वर्षांच्या मुलाचा आणि दीड वर्षांच्या बाळाचा समावेश असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले.
Pimpri-Chinchwad Crime 26 May 2025 : मोशी प्राधिकरणात दोन लाखांची घरफोडी
या अमानुष कृत्याचा तपास करत असताना पोलिसांनी महत्त्वाचा धागा शोधला आहे. या महिलेच्या उजव्या हातावर ‘जय भीम’ असा टॅटू आढळून आल्याने तिची ओळख पटवण्याच्या दिशेने तपास सुरु झाला आहे. मृतदेह इतक्या गंभीर स्वरूपात जळाले होते की, त्यांची ओळख पटवणे अत्यंत कठीण ठरत आहे. फॉरेन्सिक पथक घटनास्थळी पोहोचले असून, मृतदेहांचे अवशेष तपासले (Ranjangaon Crime) जात आहेत.
पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार, तिघांना अन्यत्र ठार मारून या ठिकाणी आणण्यात आले आणि नंतर पेट्रोल टाकून त्यांचे मृतदेह पेटवण्यात आले. मात्र, पावसामुळे आग पूर्ण विझली आणि त्यामुळे काही अवशेष शिल्लक राहिले. हे मृतदेह मुख्य महामार्गापासून सुमारे २०० मीटर अंतरावर सापडले.
पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल यांनी घटनास्थळी भेट दिली असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. आई आणि मुलांना जिवंत जाळण्यात आले की आधी हत्या करून मग मृतदेह जाळण्यात आले, हे शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार आहे.
या दुर्दैवी घटनेने जिल्ह्यात भीतीचं वातावरण पसरले असून, मृतांची ओळख पटवण्यासाठी व मारेकऱ्यांचा माग काढण्यासाठी पोलीस यंत्रणा युद्धपातळीवर तपास करत (Ranjangaon Crime) आहे.