Team My Pune City – युरोप खंडातील माऊंट एलबुस हे 18 हजार 510 फूट उंचीचे ( Rangat sangat Pratishathan) सर्वोच्च शिखर सर करणाऱ्या सातारच्या 13 वर्षीय धैर्या ज्योती विनोद कुलकर्णी हिचा रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे जिद्द पुरस्काराने गौरव केला जाणार आहे.
Talegaon Dabhade: राष्ट्रीय संघाचे स्वयंसेवक नारायण अभ्यंकर यांचे निधन
पुरस्कार वितरण समारंभ शनिवार, दि. 13 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता ( Rangat sangat Pratishathan) महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. पुरस्काराचे वितरण शिखर बँकेचे अध्यक्ष, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे उपाध्यक्ष विद्याधर अनास्कर यांच्या हस्ते होणार असून अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी अध्यक्षस्थानी असणार आहेत.
Vakad News : वाकडमध्ये इलेक्ट्रिक दुचाकी जाळून खाक
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी यांची विशेष उपस्थिती असेल, अशी माहिती रंगत-संगत प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर यांनी निवेदनाद्वारे कळविली आहे. सन्मानपत्र व भेटवस्तू असे पुरस्काराचे स्वरूप आहे. कार्यक्रम सर्वांसाठी ( Rangat sangat Pratishathan) खुला आहे.