रामवाडीमध्ये हजारो भाविकांच्या उपस्थितीत रामनवमी अमृतमहोत्सव होणार साजरा
Team MyPuneCity – श्रीराम नवमीनिमित्त सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील रामवाडी येथील श्रीराम मंदिर येथे 31 मार्च ते 7 एप्रिल या कालावधीत अखंड हरीनाम सप्ताह आणि ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरीचे सामुदायिक पारायणाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात ( Ramnavami Amrit Mahotsav ) आले आहे.
या सोहळ्याचे यंदाचे अमृतमहोत्सवी वर्ष आहे. हरिनाम सप्ताहाची सुरूवात देहूचे हभप भानुदास महाराज मोरे यांच्या कीर्तनाने सोमवारी (दि.31) झाली. मंगळवारी (दि.1) विनोदाचार्य हभप हरी महाराज आमरापूरकर यांचे कीर्तन होणार आहे. बुधवारी (दि.2) हभप अमोल महाराज सुळ यांचे कीर्तन आहे. गुरूवारी (दि.3) हभप संगीताताई चोपडे यांचे कीर्तन, शुक्रवारी (दि.4) हभप सार्थक महाराज गायकवाड, शनिवारी (दि.5) आणि रविवारी (दि.6) हभप सोमेश्वर महाराज गवळी यांचे कीर्तन होणार आहे.
Dr. Swapnil Kamble : डॉ. स्वप्नील कांबळे यांना फ्रान्स विद्यापीठाची मानद डॉक्टरेट प्रदान
सोमवारी (दि.7) सकाळी 10 ते दुपारी 12 या वेळेत सातार्याचे हभप आझाद महाराज गुजर यांच्या काल्याचे कीर्तनाने कार्यक्रमाची सांगता होणार आहे. त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम आहे. त्यापूर्वी सकाळी 8 ते 9 यावेळेत ज्ञानेश्वरी पारायणाची सांगता होणार आहे.
सोहळ्यात दररोज पहाटे 4 ते 6 या वेळेत काकड आरती आहे. सकाळी 8 ते 11 या वेळेत आणि दुपारी 3 ते सायंकाळी 5 यावेळेत ज्ञानेश्वरीचे सामुदायिक पारायण होणार आहे. सायंकाळी 6 ते 7 या वेळेत हरीपाठ आणि रात्री 9 ते 11 या वेळेत हरी कीर्तन होणार आहे. सायंकाळी 7 ते रात्री 11 या वेळेत दीपक साबळे यांचा होममिनिस्टर कार्यक्रम आहे.
Indori News : इंदोरी भुईकोट किल्ल्यात फडकला ६१ फूट उंच भगवा ध्वज!
कार्यक्रमात व्यासपीठ हभप हरीष महाराज आळंदीकर यांच्याकडे आहे. विणेकरी हभप शामराव महाराज गलगले आहेत. मृदंगमणी हभप संदीप महाराज सपाटे, हभप निखिल महाराज पवार, हभप पार्थ महाराज भांदिर्गे आहेत. हार्मोनियमची साथ हभप रामचंद्र महाराज शिंगटे करणार आहेत. हभप सुनील महाराज सणस, हभप यशवंत महाराज पाडळे, हभप कल्पनाताई सणस हे चोपदार आहेत. हभप संतोष महाराज माने, हभप सुमित महाराज चव्हाण, हभप अविनाश महाराज महाडीक, हभप गणेश महाराज किर्वे, हभप संतोष महाराज भांदिर्गे हे काकडा, हरीपाठ, कीर्तन साथर करणार आहेत.

दरम्यान, शनिवारी (दि.5) सकाळी दहाला श्रीराम रथोत्सव सोहळा होणार आहे. संजय पोफळे, भरत पोफळे यांच्याकडून महाप्रसाद आहे. कार्यक्रमाचे संयोजन रामवाडीतील श्रीराम जन्मोत्सव यात्रा कमिटी आणि रामवाडी (Ramnavami Amrit Mahotsav) ग्रामपंचायतीने केले आहे.