Team My Pune City – “भारताने संरक्षण क्षेत्रात आयात ( Rajnath Singh)केलेल्या तंत्रज्ञानावर अवलंबून राहण्याची वेळ आता मागे टाकली आहे. डीआरडीओने देशातच अत्याधुनिक तंत्रज्ञान विकसित केले असून, भविष्यातील जागतिक स्तरावरील उत्पादनांमध्येही आपला ठसा उमटवला आहे. आज भारत केवळ स्वतःच्या गरजा पूर्ण करत नाही, तर जगासाठी विश्वासार्ह संरक्षण भागीदार ठरत आहे,” असे प्रतिपादन संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी केले.
Accident : पुण्यात दोन वाहनांच्या अपघातात कारने घेतला पेट, चालक किरकोळ जखमी
ते पुण्यातील शस्त्रास्त्र संशोधन आणि विकास संस्था (ARDE) येथे संरक्षण मंत्रालयाच्या सल्लागार समितीच्या बैठकीनंतर बोलत होते. या वेळी संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ, संरक्षण दलप्रमुख जनरल अनिल चौहान, संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह, संरक्षण उत्पादन सचिव संजिव कुमार, तसेच डीआरडीओचे अध्यक्ष डॉ. समीर कामत उपस्थित ( Rajnath Singh) होते.
सिंह म्हणाले की, उदयोन्मुख तंत्रज्ञानामुळे सेनादलांचे आधुनिकीकरण वेगाने होत असून तरुणांसाठीही नवीन संधी निर्माण होत आहेत. “आजच्या काळात विज्ञान आणि नवोन्मेषाला प्राधान्य देणारे देशच भविष्यात नेतृत्व करतील. तंत्रज्ञान हे केवळ प्रयोगशाळांपुरते मर्यादित न राहता धोरणात्मक निर्णय, संरक्षण व्यवस्था आणि भविष्यातील राष्ट्रीय धोरणांचे अधिष्ठान बनले आहे,” असे ते ( Rajnath Singh) म्हणाले.
त्यांनी पुढे सांगितले की, आत्मनिर्भरता ही केवळ ध्येय नसून राष्ट्रीय सुरक्षेची सर्वात मजबूत ढाल आहे. अनेक देश अत्याधुनिक तंत्रज्ञानाबाबत माहितीची देवाणघेवाण टाळतात, मात्र भारताने या मर्यादांना आव्हान देत स्वतःला तंत्रज्ञानाचा वापरकर्ता नव्हे तर निर्माता म्हणून सिद्ध केले आहे. ( Rajnath Singh)
त्यांनी पुढे सांगितले की, आत्मनिर्भरता ही केवळ ध्येय नसून राष्ट्रीय सुरक्षेची सर्वात मजबूत ढाल आहे. अनेक देश अत्याधुनिक तंत्रज्ञानाबाबत माहितीची देवाणघेवाण टाळतात, मात्र भारताने या मर्यादांना आव्हान देत स्वतःला तंत्रज्ञानाचा वापरकर्ता नव्हे तर निर्माता म्हणून सिद्ध केले आहे.
समितीने भेटीदरम्यान अॅडव्हान्स्ड टोड आर्टिलरी गन सिस्टीम, पिनाका रॉकेट सिस्टीम, झोरावर रणगाडा, आकाश-न्यू जनरेशन मिसाईल यांसारख्या अत्याधुनिक उत्पादनांची पाहणी केली. तसेच रोबोटिक्स, रेल गन, इलेक्ट्रोमॅग्नेटिक एअरक्राफ्ट लॉन्च सिस्टीम, हाय एनर्जी प्रोपल्शन मटेरिअल्स यांसारख्या भविष्यातील संशोधन आराखड्याची माहितीही समितीला देण्यात ( Rajnath Singh) आली.