Team MyPuneCity – वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात सात दिवसांपासून फरार असलेले राष्ट्रवादी (अजित गट) चे माजी पदाधिकारी राजेंद्र हगवणे (Rajendra Hagawane Arrested) आणि त्यांचा मुलगा सुशील हगवणे यांना अखेर शुक्रवारी पहाटे स्वारगेट येथे अटक करण्यात आली. अटकेपूर्वी या दोघांचे तळेगावातील एका हॉटेलमध्ये जेवताना सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर पोलिसांनी सापळा रचत त्यांना ताब्यात घेतले.
वैष्णवी शशांक हगवणे (वय २३, रा. पिंपरी) हिने १६ मे रोजी सासरच्या शारीरिक आणि मानसिक छळाला कंटाळून राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या प्रकरणी पती शशांक हगवणे, सासू लता हगवणे आणि नणंद करिश्मा हगवणे यांना पोलिसांनी यापूर्वीच अटक केली आहे. मात्र सासरे राजेंद्र हगवणे (Rajendra Hagawane Arrested) आणि दीर सुशील हगवणे हे फरार होते.
Vaishnavi Hagwane : वैष्णवी हगवाणे यांचे बाळ त्यांच्या आई वडिलांकडे सुपूर्द
शुक्रवारी पहाटे साडेचारच्या सुमारास पोलिसांनी या दोघांनाही ताब्यात घेतले. अटकेपूर्वी तळेगाव येथील एका हॉटेलमध्ये मटणावर ताव मारताना या दोघांचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले होते. या फुटेजमुळे त्यांचा ठळक पत्ता मिळून पोलीस हालचालींना वेग आला. त्यानंतर एकीकडे आरोपी (Rajendra Hagawane Arrested) मोकाट फिरत असताना पोलिसांचा तपास नेमका कसा चालला होता, याबाबत प्रश्नही उपस्थित होत आहेत.
वैष्णवीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार, लग्नात ५१ तोळे सोने, फॉर्च्यूनर गाडी आणि चांदीची भांडी दिल्यानंतरही हगवणे कुटुंबीयांनी तिचा शारीरिक आणि मानसिक छळ सुरूच ठेवला. किरकोळ कारणावरून भांडण, चारित्र्यावर संशय घेणे, पैशाची मागणी करणे, अशा प्रकारांनी वैष्णवीला छळले जात होते. तिच्या मृतदेहाच्या शवविच्छेदन अहवालातही शरीरावर मारहाणीचे व्रण आढळून आले.
Copyright Violation : बनावट कपडे विक्री प्रकरणी तळेगाव मधील सहा दुकानांवर कारवाई
या प्रकरणाचा तपास पिंपरी पोलीस करत असून, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली चौकशी पुढे सुरू आहे. राजेंद्र हगवणे (Rajendra Hagawane Arrested) हे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे माजी राज्य कार्यकारिणी सदस्य असून, या प्रकरणामुळे पक्षाच्याही अडचणीत भर पडली आहे. त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.