Team My Pune City –मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आज गोरेगावमध्ये पक्षाचा (Raj Thackeray)पदाधिकारी मेळावा घेतला. यावेळी निवडणूक याद्यांमधील गोंधळाचा मुद्दा त्यांनी मांडला. जोपर्यंत मतदार यादी पूर्ण स्वच्छ होत नाही, सर्व राजकीय पक्षांचं समाधन होत नाही तोपर्यंत तुम्ही निवडणुका घेऊनच दाखवाच असं निवडणूक आयोगाला आव्हान त्यांनी दिल.
निवडणूक यादीत खोटी नावं भरुन निवडणुकांना सामोरं जायचं म्हणत आहे. पण जोपर्यंत मतदार यादी पूर्ण स्वच्छ होत नाही, सर्व राजकीय पक्षांचं समाधन होत नाही तोपर्यंत तुम्ही निवडणुका घेऊनच दाखवाच. निवडणुका शांतेतेने पार पाडायच्या असतील तर आधी मतदार यादी स्वच्छ करा, असं राज ठाकरेंनी आयोगाला सांगितलं आहे.
Kondhwa: कोंढवा पोलिस कारवाईदरम्यान ड्रग ट्रॅफिकरचा मृत्यू
Talegaon Dabhade: संध्यासूरांत न्हाली ‘इंद्रायणी’ ची दिवाळी
मतदाराचा आदर करा, जो खरा मतदार आहे त्याला मतदान करु द्या. कोण सत्तेवर आणि कोण विरोधात येईल याच्याशी मला घेणं देणं नाही. जे मतदान होईल ते खरं होईल त्याच दृष्टीकोनातून निवडणूक झाल्या पाहिजेत. यादी प्रमुखांनी, शाखाध्यक्ष, गटाध्यक्षांनी प्रत्येक ठिकाणी कोण राहतं, किती मतदार आहेत हे तपासायला सुरुवात करा. या लोकांनी शेण खाऊन ठेवलं आहे ते बाहेर येईल. सगळ्या महाराष्ट्रभर हे सुरु झालं पाहिजे, असं आवाहन त्यांनी केलं आहे.
ते पुढे म्हणाले , ‘फक्त आपल्याच नाही तर प्रत्येक पक्षाने घऱाघऱात गेलं पाहिजे. हे जोपर्यंत स्वच्छ होत नाही तोपर्यंत महाराष्ट्रात निवडणूका घेऊ नका. अजून एखादं वर्ष गेलं तरी चालेल. यांची घाई यासाठीच सुरु आहे. यांनी सगळं गणित जमवलं आहे. पुढे कसं जायचं याचे टप्पे ठरले आहेत, सगळं योग्यवेळी सांगणार. आज 3 वाजता एक सर्वपक्षीय पत्रकार परिषद आहे. पुढचा कार्यक्रम सांगितला जाईल, त्यानुसार तयारीला लागा. कशासाठी काय षडयंत्र सुरु आहे ते ओळखा आणि मतदार याद्यांच्या कामाला लागा.
“अनेकजण म्हणतात राज ठाकरेंच्या सभांना गर्दी होते, पण मतांमध्ये येत नाही. असं केल तर मतांमध्ये कसं येईल. स्थानिक पक्षांना संपवणं, मिटवून टाकणं, अशा मतदारयाद्या तयार करायच्या. त्यात माणसं घुसवायची. आता होणाऱ्या निवडणुकांची यादी 1 जुलैला बंद करुन टाकली आहे. विधानसभेत तर होतेच, पण आताही ९६ लाख खोटे मतदार महाराष्ट्राच्या यादीत भरले आहेत. अशाच निवडणुका होणार असतील तर मग कशासाठी प्रचार करायचा, पैसे खर्च करायचे, उमेदवार द्यायचे? हा महाराष्ट्रा आणि मतदाराचा अपमान आहे,” असा राज ठाकरें म्हणाले.