Team My Pune City – महाराष्ट्राच्या बहुतांश भागातून ( Rain Update) मान्सून परतला असला तरी, राज्यात पुन्हा पावसाचे वातावरण निर्माण झाले आहे. उन्हाची तीव्रता कायम असतानाच, हवामान विभागाने कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात आज (१६ ऑक्टोबर) विजांसह पावसाचा अंदाज वर्तवला असून अलर्ट जारी केला आहे.
पुणे
बुधवारी पुण्यात कमाल तापमान ३१.८ अंश सेल्सिअस नोंदले गेले. आज जिल्ह्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असून, पारा ३२ अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याचा अंदाज आहे. हवामान विभागाने नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे.
Valvan: वलवण गावातील श्री महालक्ष्मी मंदिरात चांदी-सोन्याची चोरी; देवीचा मुखवटा व मंगळसूत्र लंपास
सातारा
गेल्या २४ तासांत साताऱ्यातील कमाल तापमान ३२.४ अंश सेल्सिअस ( Rain Update) होते. आज घाट परिसरासह संपूर्ण जिल्ह्यात विजांसह पावसाचा अंदाज आहे. ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता असल्याने हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे.
कोल्हापूर
बुधवारी कोल्हापूरमध्ये ३१.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पुढील २४ तासांत जिल्ह्यात आणि घाट भागात विजांसह पाऊस पडण्याची शक्यता असून, कमाल तापमान ३० अंश सेल्सिअसच्या आसपास राहील.
Diwali Muhurta : या दिवाळीत करा योग्य वेळी पूजा! 2025 च्या पंचांगानुसार दीपावलीचे सर्व खास मुहूर्त
सोलापूर
सोलापूरमध्ये बुधवारी ३४.७ अंश सेल्सिअस तापमान आणि २ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. आज जिल्ह्यात विजांसह पावसाचा अंदाज असून, पारा ३५ अंशांपर्यंत पोहोचण्याची ( Rain Update) शक्यता आहे.
सांगली
गेल्या २४ तासांत सांगली जिल्ह्यात २९.६ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. बुधवारी जत, कवठेमहांकाळ, पलूस आणि कडेगाव भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. आज पुन्हा विजांसह पावसाचा अंदाज असून, कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस राहील.
पश्चिम महाराष्ट्र व राज्यातील इतर भाग
संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात आज वादळाचा इशारा देण्यात आला आहे. राज्यातील इतर भागातही काही ठिकाणी वादळ येण्याची शक्यता आहे. कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त असून, नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन हवामान विभागाने केले ( Rain Update) आहे.