Team My Pune City –राज्यातील बहुतांश ( Rain Update)भागांतून मान्सून परतला असून ‘ऑक्टोबर हीट’चा प्रभाव अद्यापही जाणवत आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आज १४ ऑक्टोबर रोजी दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यातील इतर भागांत उष्णतेची लाट कायम राहणार असून काही ठिकाणी विजांसह हलक्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील हवामानाचा आढावा घेतल्यास, पुणे जिल्ह्यात सोमवारी कमाल तापमान ३२.५ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. आज विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाचा अंदाज असून तापमान ३३ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याची शक्यता( Rain Update) आहे.
सातारा जिल्ह्यात गेल्या २४ तासांत कमाल तापमान ३१.७ अंश सेल्सिअस नोंदले गेले. आज संपूर्ण सातारा आणि घाटमाथ्याच्या भागात विजांसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून तापमान ३१ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे.
Rashi Bhavishya 14 Oct 2025 – कसा जाईल आपला आजचा दिवस?
सोलापूर जिल्ह्यात तापमान ३४.४ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले असून, विजांसह पावसाची शक्यता लक्षात घेता हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. सांगली जिल्ह्यातही कमाल तापमान ३२.४ अंश सेल्सिअस नोंदवले गेले असून, येत्या २४ तासांत विजांसह पावसाचा इशारा देण्यात( Rain Update) आला आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील दोन जिल्ह्यांमध्ये पुढील २४ तासांत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असून, एकूण पाच जिल्ह्यांमध्ये अशाच प्रकारचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सध्या तापमान गोठणबिंदूच्या वर असून पारा सातत्याने वाढत ( Rain Update) आहे.