Team My Pune City –यंदा मान्सूनने महाराष्ट्रात जोरदार हजेरी लावली. (Rain News )पावसामुळे आधीच मोठं नुकसान झाले आहे. आता पुन्हा एकदा भारतीय हवामान विभागाने राज्यात पावसाचा इशारा दिला आहे. पुढील तीन दिवस महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये विजांसह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आज मुंबई,, ठाणे, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, नाशिक, धुळे, जळगाव, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
उद्या 24 ऑक्टोबर रोजी मुंबई शहर, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, पालघर, कोल्हापूर, सातारा, सांगली, नाशिक, धुळे, नंदुरबार, अहिल्यानगर, बुलढाणा, वाशिम, बीड, धाराशिव, लातूर, चंद्रपूर, नागपूर वर्धा या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला असून, या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आहे.
Bavdhan Khurd:मल्टीनॅशनल IT कंपनीचे करोडोंचे फसवणूक प्रकरण उघड : ७५ अभियंत्यांना नोकरीचे आमिष दाखवून लाखोंची लूट
25 ऑक्टोबरला सांगली, सोलापूर, धुळे, नंदूरबार, अमरावती, अकोला, बुलढाणा, पालघर, रत्नागिरी, सिंधूदुर्ग, धाराशीव, जालना बीड, नंदुरबार या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला.
राज्यात अनेक ठिकाणी धानाची कापणी आणि कापूस वेचणी सुरू आहे, अशा परिस्थितीमध्ये पाऊस पडल्यास त्याचा मोठा फटका हा धान आणि कापसाला बसण्याची शक्यात आहे. यामध्ये शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होऊ शकतं.