Team My Pune City – हवामान विभागान 17 जुलै रोजी पुढच्या काही आठवड्यांसाठीचा अंदाज जाहीर केला आहे.त्यानुसार पुढील पाच दिवस राज्यात (Rain)हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहणार आहे.
Dhol Tasha Pathak : मैदानावर ढोल – ताशा पथकाला सरावाला परवानगी नाही – आयुक्त नवल किशोर राम
मात्र 18 ते 24 जुलै या कालावधीत राज्यात जवळपास सर्व ठिकाणी सरासरपेक्षा कमी पावसाची शक्यत आहे. तर 24 ते 31 जुलै या कालावधीत महाराष्ट्रासह, मध्य भारतातील काही भागात सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता आहे. त्याशिवाय 31 जुलै ते 7ऑगस्ट कालावधीत मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याच्या काही भागात सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता (Rain)आहे.
तसेच या कालावधीत घाट व कोकण भागात मेघ गर्जनेसह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. ऑगस्ट महिन्यात मराठवाडा येथे सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
राज्यभरातील धरणातील पाणीसाठा हा अर्ध्याच्या वर गेला असला तरी अद्याप धरणे 100 टक्के भरलेली नाहीत.शिवाय पेरणी झाल्या नंतर पावसाने काही काळ उघडीप दिल्यानेही मराठवाडा ,विदर्भात शेतकरी पावसाकडे नजर लावून बसला आहे. शेतकरी पावसाकडे नजर लावून (Rain) बसला आहे.