Team MyPuneCity – राज्यात ( Rain ) येत्या काही दिवसांत मुसळधार पावसाने हजेरी लावण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे येत्या रविवारी (दि. २५ मे) संपूर्ण महाराष्ट्रात ‘रेड अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, २४ ते २८ मेदरम्यान अनेक भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.
Team MyPuneCity – राज्यात येत्या काही दिवसांत मुसळधार पावसाने हजेरी लावण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे येत्या रविवारी (दि. २५ मे) संपूर्ण महाराष्ट्रात ‘रेड अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, २४ ते २८ मेदरम्यान अनेक भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.
अरबी समुद्रात तयार झालेलं कमी दाबाचं क्षेत्र काल (शुक्रवारी, दि. २३) तीव्र स्वरूपात परिवर्तित झालं असून ते पुढील २४ तासांत उत्तरेकडे सरकणार आहे. परिणामी, दक्षिण कोकण आणि गोवा किनारपट्टीवर हवामान अधिकच अस्थिर झाले आहे. याच पार्श्वभूमीवर कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात जोरदार पावसाचा इशारा दिला गेला आहे.
मान्सूनच्या आगमनाच्या तयारीत केरळ आणि बंगालच्या उपसागरात हालचाली
दक्षिण-पश्चिम मान्सून केरळमध्ये दोन दिवसांत दाखल होण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरातील शाखाही सक्रिय झाल्या असून त्या पश्चिम बंगालमध्ये मान्सून प्रवेश करेल, असा अंदाज आहे. त्यामुळे महाराष्ट्रातही लवकरच पावसाळ्याची दमदार सुरुवात होण्याची ( Rain ) शक्यता आहे.
‘या’ जिल्ह्यांना अधिक धोका, वाहतूक आणि जनजीवनावर परिणाम होण्याची शक्यता
- कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा आहे.
- पालघर, ठाणे आणि मुंबईत हलक्यापासून मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे.
- उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, जळगाव आणि नाशिक जिल्ह्यांतही वाऱ्यांसह पावसाचा अंदाज आहे.
मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातही जोरदार पावसाची शक्यता
- पुणे, कोल्हापूर, अहमदनगर, सातारा जिल्ह्यांत मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज.
- सांगली, सोलापूरमध्ये हलक्यापासून मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो.
- मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, लातूर, नांदेड, धाराशिव जिल्ह्यांत वादळी वाऱ्यांसह पावसाचा इशारा.
- विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, वर्धा, यवतमाळ, वाशिम, अकोला, अमरावती, बुलढाणा जिल्ह्यांत मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार.
नागरिकांना सतर्कतेचा इशारा, मच्छीमारांसाठी समुद्रात जाण्यास बंदी
हवामान विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं असून, विजांच्या कडकडाटात झाडांखाली, उंच इमारतीजवळ किंवा विद्युत खांबाजवळ थांबू नये, असं स्पष्ट केलं आहे. अनावश्यक प्रवास टाळावा आणि सुरक्षित ठिकाणी राहावं, असेही आवाहन करण्यात आले आहे. मच्छीमारांना पुढील काही दिवस समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे, कारण ( Rain ) अरबी समुद्रात वारे जोराने वाहण्याची शक्यता आहे.