Team My pune city – नंजनगूडू श्री वरदेंद्र श्री राघवेंद्र स्वामी मठातर्फे ( Raghavendra Swamy Math) दि. 10 ते 12 ऑगस्ट 2025 या कालावधीत श्री राघवेंद्र स्वामी यांच्या 354व्या आराधना महोत्सवाचे पुण्यात आयोजन करण्यात आले आहे.
श्री राघवेंद्र स्वामी महासंस्थानचे मंत्रालय (आंध्रप्रदेश) पिठाधीश्वर श्री श्री 108 श्री सुबुधेंद्रतीर्थ श्रीपादा: पिठाधीपतिगलू नंजनगुडू यांच्या शुभआशीर्वादाने हा महोत्सव सदाशिव पेठेतील लक्ष्मी रस्त्यावरील श्री वरदेंद्र श्री राघवेंद्र स्वामी मठ येथे होणार Raghavendra Swamy Math)आहे.
या महोत्सवानिमित्त दि. 9 ऑगस्ट रोजी सकाळी 7 वाजता नित्य आराधना तर 9 वाजता नूतन आराधना होणार आहे. रविवार, दि. 10 रोजी पूर्व आराधना, सोमवार, दि. 11 रोजी मध्य आराधना तर मंगळवार, दि. 12 रोजी उत्तर आराधना होणार आहे. तसेच दि. 12 रोजी सकाळी 10:35 वाजता रथोत्सवाचे आयोजन करण्यात ( Raghavendra Swamy Math) आले आहे.