Team My Pune City – चोवीसावाडी येथील रेड क्लिफ स्कूलमधील ( Rad Cliffe School) पालक-शिक्षक संघ (PTA) निवडणूक प्रक्रियेत वारंवार अनियमितता आढळल्याने ही निवडणूक तिसऱ्यांदा स्थगित करण्यात आली आहे.
शाळेत दोन वेळा झालेल्या निवडणुकीत चुकीच्या पद्धतीने व बोगस फॉर्म भरून प्रक्रिया पार पाडल्याच्या पालकांच्या तक्रारींवर पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या ( Rad Cliffe School) प्रशासन अधिकारी सौ. संगीता बांगर यांनी लेखी आदेश काढून निवडणूक रद्द केली होती.
पालकांचा ठाम आग्रह आहे की निवडणूक पारदर्शक पद्धतीने आणि प्रत्यक्ष मतदानाद्वारे घ्यावी. मात्र शाळा व्यवस्थापनाने बोगस पद्धतीने प्रक्रिया राबवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप पालकांनी केला आहे. त्यामुळे तिन्ही वेळा निवडणुकीवर संशय निर्माण ( Rad Cliffe School) झाला.
Paranjape Vidya Mandir : परांजपे विद्यामंदिरात अत्याधुनिक संगणक दालनाचे उद्घाटन
याच पार्श्वभूमीवर १३ ऑक्टोबर २०२५ रोजी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने शाळेचे प्राचार्य व व्यवस्थापन समितीला आदेश देत PTA निवडणूक पुन्हा नव्याने घेण्याचे निर्देश दिले.
पालकांच्या मते, PTA निवडणूक ( Rad Cliffe School) घेण्यापूर्वी महानगरपालिकेला कळवणे आवश्यक आहे. तसेच पारदर्शक पद्धतीने मतदान घेऊन प्रक्रिया पूर्ण करावी. अन्यथा निवडणूक रद्द करून पालकांची महासभा बोलावावी, अशी त्यांची मागणी आहे.