Team My Pune City – महाराष्ट्रीय कलोपासक आयोजित हीरक महोत्सवी स्पर्धेच्या पुरुषोत्तम करंडकावर( Purushottam Karandak) नाव कोरण्यासाठी अंतिम फेरीतील नऊ संघ करंडक पटकावयाचाच या जिद्दिने आणि ध्यासाने स्पर्धेत उतरणार आहेत.
पुरुषोत्तम करंडक स्पर्धेच्या प्राथमिक फेरीतून निवडलेल्या नऊ संघांची अंतिम फेरी भरत नाट्य मंदिरात होत आहे. दि. 13 रोजी सायंकाळी 5 ते 8 तर दि. 14 रोजी सकाळी 9 ते 12 आणि सायंकाळी 5 ते 8 या वेळात सहभागी संघांचे सादरीकरण होणार आहे.
Vadgaon Maval News : शिक्षकांनी आपले ज्ञान सतत अद्ययावत करावे – अशोक बाफना
महाराष्ट्रीय कलोपासकच्या वाटचालीत स्पर्धेचा हीरक महोत्सवी टप्पा जसा महत्त्वाचा आहे; त्याचप्रमाणे सहभागी संघातील विद्यार्थ्यांच्या दृष्टीनेही स्पर्धा लक्षणीय आहे. या वेगळ्या टप्प्यावर पोहोचलेल्या नऊ महाविद्यालयातील विद्यार्थी दिवस-दिवस तालमी करीत आहेत. प्राथमिक फेरीत ज्या उणीवा जाणवल्या त्या दूर करण्याच्या प्रयत्नातही आहेत.
Diveghat : दिवेघाटातील रस्ता रुंदीकरणामुळे शुक्रवारी सकाळी 11 ते दुपारी 2 वाहतूक बंद
—
प्राथमिक फेरीत नाट्य संकल्पना, संवाद लेखन आणि अभिनय याकडे विशेष लक्ष दिले. प्रत्यक्ष सादरीकरणावेळी ज्या त्रुटी आढळल्या त्या दूर करण्याचा प्रयत्न करीत आहोत. अंतिम फेरीतील सादरीकरण परिपूर्ण व्हावे यासाठी प्रत्येकजण सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करीत आहे. यंदाच्या अंतिम फेरीतील सहभाग आमच्यासाठी गौरवाचा आहे. ( Purushottam Karandak)
– आस्था काळे, अण्णासाहेब मगर महाविद्यालय
-==-
स्पर्धेत पहिल्यांदाच सहभाग घेतला आणि अंतिम फेरीत पोहोचलो. अंतिम फेरीत सादरीकरणासाठी सर्वचजण उत्सुक आहोत. अंतिम फेरीच्या दृष्टीने जे थोडेफार बदल केले आहेत ते नक्कीच पसंतीस पडतील असा विश्वास आहे.
– प्रसाद लोहकरे, डीईएस, पुणे युनिर्व्हसिटी
—
स्पर्धेच्या पहिल्या वर्षापासून महाविद्यालयाने दर्जेदार एकांकिका दिल्या आहेत. स्पर्धेचे हीरक महोत्सवी वर्ष असल्याने स्पर्धेतील सहभाग आमच्या दृष्टीनेही मोलाचा आहे. सलग तिसऱ्या वर्षी आमचे महाविद्यालय अंतिम फेरीत पोहोचले आहे. यंदा एकांकिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांना नवा दृष्टीकोन देण्याचा प्रयत्न आहे.
– उर्व चिंचवडे, स. प. महाविद्यालय( Purushottam Karandak)
=-=-=
महाविद्यालय अनेक वर्षांपासून स्पर्धेत सहभागी होत असून स्पर्धेत विविध पारितोषिकेही मिळाली आहेत. प्राथमिक फेरीत उत्कृष्ट सादरीकरण करून अंतिम फेरीत प्रवेश मिळविला असल्याने अंतिम फेरीत अधिक नेटकेपणाने सादरीकरणाचा प्रयत्न आहे.
– तुकाराम लव्हरे, मराठवाडा मित्र मंडळाचे वाणिज्य महाविद्यालय
=-==
महाविद्यालय अंतिम फेरीत चौथ्यांदा पोहोचले आहे. स्पर्धेचे दडपण आहे; परंतु प्रयोग व्यवस्थित करण्याचा प्रयत्न आहेच. दशावतारावर नाटक आधारित असल्याने आम्ही बराच अभ्यास केला. स्पर्धेमुळे जुन्या परंपरांचा अभ्यास झाल्याने अंतिम फेरीतील सादरीकरणाची उत्सुकता आहे.
– अनिकेत खरात, मॉडर्न महाविद्यालय, गणेशखिंड ( Purushottam Karandak)
—
वास्तववादी विषय हीच आमच्या एकांकिकेची ताकद आहे. प्राथमिक फेरीत प्रामाणिकपणे सादरीकरण केल्याने महाविद्यालय अंतिम फेरीत पोहोचले आहे. यंदा आमच्या एकांकिकेला करंडक मिळेल असा विश्वास असून त्या दृष्टीने तयारी सुरू आहे.
– रागिणी आळंदकर, पुणे विद्यार्थीगृहाचे अभियांत्रिकी, तंत्रज्ञान व व्यवस्थापन महाविद्यालय
-===-
महाविद्यालयाने यापूर्वी स्पर्धेत विविध बक्षिसे मिळविली आहेत. पण यंदाचा संघ पूर्णपणे नवीन आहे. दोन वर्षांच्या खंडानंतर आमच्या महाविद्यालयाला स्पर्धेत सहभाग मिळाला ही आमच्या दृष्टीने मोठी संधी आहे. अंतिम फेरीत पोहोचल्याने उत्साह दुणावला आहे. अंतिम फेरीत शंभर टक्के योगदान देण्याचा प्रयत्न आहे.
– पार्थ करपे, श्रीमती काशिबाई नवले अभियांत्रिकी महाविद्यालय
—=-=
अंतिम फेरीचे वेळापत्रक ( Purushottam Karandak)
शनिवार, दि. 13
वेळ : सायंकाळी 5
यथा प्रजा, तथा राजा (म. ए. सो. सिनिअर कॉलेज, पुणे)
पावसात आला कोणी.. (मराठवाडा मित्र मंडळाचे वाणिज्य महाविद्यालय)
रामरक्षा (आय. एम. सी. सी. स्वायत्त)
रविवार, दि. 14
सकाळी 9
काही प्रॉब्लेम आहे का? (अण्णासाहेब मगर महाविद्यालय, हडपसर)
व्हिक्टोरिया (डी. ई. एस. पुणे युनिव्हर्सिटी, पुणे)
निर्वासित (श्रीमती काशिबाई नवले अभियांत्रिकी महाविद्यालय)
सायंकाळी 5
आतल्या गाठी (स. प. महाविद्यालय)
कोयता (पुणे विद्यार्थी गृहाचे अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय)
वामन आख्यान (मॉडर्न कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, गणेशखिंड)