Team My Pune City – पुरंदर तालुक्यातील प्रस्तावित छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी आवश्यक ( Purandar Airport)असलेल्या १,२८५ हेक्टर जमिनीपैकी १,२५४ हेक्टरची मोजणी पूर्ण झाली आहे. याशिवाय विमानतळालगतची १४८ हेक्टर अतिरिक्त जमीन देण्यास शेतकरी तयार असून, तिची मोजणी पुढील आठवड्यात पूर्ण होणार आहे. त्यानंतरचा अहवाल राज्य सरकारकडे पाठविला जाणार आहे.
विमानतळासाठी कुंभारवळण, एखतपूर, पारगाव, मुंजवडी, खानवडी, उदाचीवाडी आणि वनपुरी या सात गावांतील जमीन संपादित केली जाणार आहे. प्रशासनाने २६ सप्टेंबरपासून मोजणीची प्रक्रिया सुरू केली होती. शेतकऱ्यांनी स्वेच्छेने अतिरिक्त जमीन देण्याची तयारी दर्शविल्याने आता एकूण क्षेत्रफळ वाढणार आहे.
पुढील प्रक्रिया
मोजणीचा अहवाल सरकारकडे गेल्यानंतर उच्चस्तरीय समिती भूसंपादनाच्या मोबदल्याचा दर निश्चित करेल. त्यानंतर शेतकऱ्यांशी चर्चा करून करारनामे करण्यात येतील. निवाडे जाहीर झाल्यानंतर मोबदला वाटपाची प्रक्रिया सुरू होईल, असे प्रशासनाने स्पष्ट ( Purandar Airport) केले.
शेतकऱ्यांच्या अपेक्षा
‘एमआयडीसी’ कायद्यातील भूसंपादन कलम ३३(१) नुसार प्रसिद्धिपत्रक जारी होणार आहे. दराबाबत शंका असल्यास शेतकऱ्यांशी पुन्हा वाटाघाटी करून दर निश्चित केला जाईल. यापूर्वी शेतकऱ्यांनी विकसित भूखंडाचा परतावा वाढवून देण्याची मागणी केली होती. त्यामुळे दर निश्चितीच्या वेळी राज्य सरकार कोणता निर्णय घेते, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले ( Purandar Airport) आहे.


















