Team My Pune City – पुरंदर येथे प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी ( Purandar Airport ) होणाऱ्या भूसंपादन प्रक्रियेत शेतकऱ्यांना न्याय्य भरपाई मिळावी यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने महत्त्वाचा प्रस्ताव सादर केला आहे.
या प्रस्तावानुसार संपादित जमिनीवरील घर, गोठा, फळझाडे, विहिरी, बोअरवेल आणि जलवाहिन्यांच्या मूल्याच्या दुप्पट मोबदल्यासह शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीच्या क्षेत्राच्या १० टक्के विकसित भूखंडाचे वाटप करण्यात येणार आहे. हा भूखंड औद्योगिक, वाणिज्यिक, निवासी किंवा संमिश्र ( Purandar Airport ) वापरासाठी असणार असून किमान १०० चौरस मीटरपेक्षा कमी नसेल, अशी हमी प्रशासनाने दिली आहे.
Chandrika Pujari : चंद्रिकाच्या कामगिरीमुळे झोपडपट्टीतील मुलांना नवी प्रेरणा- राहुल डंबाळे
पुरंदर तालुक्यातील सात गावांतील शेतकरी प्रतिनिधींशी झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी ही माहिती दिली. त्यांनी स्पष्ट केले की, राज्य शासनाच्या अधिसूचनेनुसार उचित भरपाई, पारदर्शकता आणि शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण या दृष्टीने २०१३ च्या भूसंपादन, पुनर्वसन आणि पुनर्वसाहत अधिनियमाच्या तरतुदींनुसार मोबदला दिला जाईल. शेतकऱ्यांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करून नियमांच्या चौकटीत राहून अधिकाधिक न्याय मिळावा, यासाठी प्रशासन प्रयत्नशील असल्याचे त्यांनी अधोरेखित ( Purandar Airport ) केले.
प्रकल्पग्रस्त कुटुंबाचे घर संपादन झाले असल्यास त्यांना एरोसिटीमध्ये २५० चौरस मीटर निवासी भूखंड मोबदला दराने देण्यात येईल. भूमिहीन होणाऱ्या प्रकल्पग्रस्तांना ७६० दिवसांच्या किमान कृषी मजुरीइतकी रोख रक्कम त्रैमासिक हप्त्यांमध्ये दिली जाईल, तर अल्पभूधारकांना ५०० दिवसांच्या कृषी मजुरीएवढी रक्कम मिळणार ( Purandar Airport ) आहे.
याशिवाय, घर संपादन झालेल्या कुटुंबांना ४० हजार रुपयांचे स्थलांतर अनुदान, तर जनावरांच्या गोठा किंवा शेड स्थलांतरासाठी प्रती गोठा २० हजार रुपयांचे अर्थसहाय्य दिले जाणार आहे. तसेच प्रकल्पग्रस्त कुटुंबातील एका सदस्यास औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण देण्यात येईल आणि पात्रतेनुसार नोकरीत प्राधान्य दिले जाईल.
जिल्हाधिकारी डुडी यांनी सांगितले की, भूसंपादनापोटी शेतकऱ्यांना प्रतिएकर एक कोटी रुपयांचा मोबदला देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करून शासकीय नियमांनुसार त्यांना न्याय मिळावा, यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट ( Purandar Airport ) केले.


















