सनातन संस्थेच्या वतीने देशभरात ७७ ठिकाणी, तर पिंपरी चिंचवड येथे २ ठिकाणी भावपूर्ण वातावरणात ‘गुरुपौर्णिमा महोत्सव’ संपन्न !
Team MyPuneCity –आपल्याला हिंदुराष्ट्र हवे असेल तर ‘आदर्शरित्या कसे जगायला हवे’ याचे शिक्षण आपण द्यायला हवे, आपले आचार, उच्चार आणि विचार हे आदर्श असायला हवेत. आणि त्यासाठी आपल्या कार्याला अध्यात्मिक साधनेची जोड हवी. सनातनचे साधक त्याप्रमाणे आदर्श जीवन जगत आहेत. आपण सर्वांनी संघटित झाले पाहिजे. समाजाला धर्मशिक्षण द्यायला पाहिजे. आनंद आणि शांती हि सत्संगातूनच भेटेल असे प्रतिपादन विश्व हिंदू परिषदेचे दादा वेदक यांनी केले. ते चिंचवड (पुणे) येथील ‘समीर बँक्वेट अँड लॉन्स’या ठिकाणी गुरुवार, १० जुलै २०२५ रोजी संपन्न झालेल्या गुरुपौर्णिमा महोत्सवात बोलत होते.
यंदा गुरुपौर्णिमा महोत्सव देशभरातील ७७ ठिकाणी आणि पिंपरी चिंचवड येथे २ ठिकाणी साजरा करण्यात आला.प्रारंभ व्यासपूजन आणि प.पू. भक्तराज महाराज यांच्या प्रतिमापूजनाने झाला. सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या संदेशाचे वाचन केले गेले. ‘सनातन राष्ट्र शंखनाद’ या विषयावर प्रेरणादायी व्हिडिओ प्रक्षेपण करण्यात आले. रामराज्य स्थापनेसाठी संकल्प व सामूहिक नामजपयज्ञ करण्यात आला. धर्म, अध्यात्म, साधना, बालसंस्कार, आचारधर्म, आयुर्वेद, प्रथमोपचार, स्वसंरक्षण, हिंदु राष्ट्र आदी विषयांवरील ग्रंथप्रदर्शन आणि फलक प्रदर्शन लावण्यात आले होते.
पुणे येथील ‘समीर बँक्वेट अँड लॉन्स’, येथे विक्रम भावे लिखित ‘दाभोलकर हत्या आणि मी’ या पुस्तकाविषयी श्री. विक्रम भावे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच या वेळी विशेष आकर्षण म्हणून शिवकालीन शस्त्रास्त्रांचे दुर्मिळ प्रदर्शनही भरवण्यात आले होते.
Pravin Gaikwad :संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना काळं फासले,अक्कलकोट मध्ये राडा
Traffic congestion: तळेगाव-चाकण मार्गावरील वाहतूक कोंडी चिंताजनक; मावळमित्र समितीकडून तातडीच्या उपाययोजनांची मागणी
तळेगाव येथील अपूर्वा गार्डन मंगल कार्यालय येथे माजी जिल्हा न्यायाधीश आणि माजी धर्मादाय आयुक्त दिलीप देशमुख यांनी उपस्थितांना संबोधित केले. ईश्वराचा सेवक या भावाने आपल्या भागातील मंदिरांचे व्यवस्थापन होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे तरच आपली मंदिरे ही आपल्या धर्मासाठी प्रेरणास्थाने होतील असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. केतन पाटील यांनीही राष्ट्र धर्म याविषयी उपस्थितांना संबोधित केले.