Team My Pune City – पर्वती रॉ वॉटर येथील मुख्य प्री-स्ट्रेस लाईनमध्ये गळती रोखण्याचे तसेच फ्लोमीटर बसविण्याचे आणि देखभाल-दुरुस्तीची कामे ( Pune Water Supply) हाती घेतल्याने गुरुवार(दि.17) पर्वती जलशुद्धीकरण केंद्र व वारजे जलकेंद्र अंतर्गत येणाऱ्या अनेक भागांतील पाणीपुरवठा पूर्ण दिवसासाठी बंद राहणार आहे. यामुळे शहरातील पश्चिम भागासह मध्यवर्ती भागातही नागरिकांना पाण्याच्या तुटवड्याला सामोरे जावे लागणार आहे.
पर्वती जलशुद्धीकरण केंद्राच्या अखत्यारीतील जुने पर्वती जलशुद्धीकरण केंद्र, MLR, HLR, LLR टाकी परिसर, पर्वती टॅंकर पॉईंट, तसेच एस. एन. डी. टी. पंपिंग अंतर्गत मोठ्या प्रमाणात देखभाल व सुधारणांची कामे नियोजित आहेत. यासाठी संपूर्ण प्रणालीतील पाणीपुरवठा थांबवण्यात येणार आहे. शिवाय, शुक्रवारी म्हणजेच 18 जुलै रोजी सकाळी उशिराने आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे.
Pimpri : नवयुग श्रावणी काव्य स्पर्धेसाठी कविता पाठविण्याचे आवाहन
पाणीपुरवठा बंद असणाऱ्या भागांची यादी पुढीलप्रमाणे:
पर्वती MLR टाकी परिसर:
गुरुवार पेठ, बुधवार पेठ, काशेवाडी, क्वार्टर गेट, गंज पेठ, भवानी पेठ, नाना पेठ, लोहियानगर, सोमवार पेठ, अरुण वैद्य स्टेडियम परिसर, घोरपडे पेठ, पर्वती दर्शन, मुकुंदनगर इ. ( Pune Water Supply)
पर्वती HLR टाकी परिसर:
सहकारनगर, पद्मावती, बिबवेवाडी, महर्षीनगर, गंगाधाम, चिंतामणीनगर भाग १ व २, लेक टाऊन, शिवतेजनगर, अप्पर व लोअर इंदिरानगर, साळुंखे वस्ती, महेश सोसायटी, प्रेमनगर, आंबेडकरनगर, ढोले मळा, ठाकरे वसाहत, शिवनेरीनगर, कुमार पृथ्वी, मिठानगर, कोंढवा खुर्द (स. नं. ४२) साईबाबानगर इ.
पर्वती LLR टाकी परिसर:
शहरातील सर्व पेठा, दत्तवाडी, राजेंद्रनगर, लोकमान्य नगर, डेक्कन, शिवाजीनगर, स्वारगेट परिसर.
वारजे जलकेंद्र:
चांदणी चौक (चौकोनी) टाकी, पाषाण टाकी, बावधन, सुस रोड, भुसारी कॉलनी, सारथी शिल्प, गुरुगणेशनगर, शास्त्रीनगर, लम्हाण तांडा, निम्हण मळा, संपूर्ण सुस व पाषाण परिसर.
गांधी भवन टाकी परिसर:
काकडे सिटी, रेणुका नगर, वारजे माळवाडी, बीएसयूपी योजना, धनंजय सोसायटी, कोथरूड विभाग, शांतीवन, सहजानंद, मूणमयी प्रीमारोज, हिंगणे होम कॉलनी, रामनगर, गोसावी वस्ती, कॅनॉल रोड आदी.
पॅनकार्ड क्लब GSR टाकी परिसर:
बाणेर, बालेवाडी, पॅनकार्ड रोड, पल्लोड फॉर्म, शिंदे पारखे वस्ती, मेडिपॉईंट रोड, आंबेडकरनगर, विजयनगर, दत्तनगर.
GSR टाकी परिसर:
कर्वे नगर, शाहू कॉलनी गल्ली क्र. १ ते ११, इंगळेनगर, वारजे जकात नाका, कर्वेनगर कॅनॉल, शिवणे इंडस्ट्रीज, कोंढवे धावडे. ( Pune Water Supply)
एस. एन. डी. टी. पंपिंग (एच. एल. आर.):
गोखलेनगर, शिवाजीनगर, मॉडेल कॉलनी, कोथरूड, हॅपी कॉलनी, डहाणूकर कॉलनी, जयभवानीनगर, आयडीयल कॉलनी, भांडारकर रोड, सेनापती बापट रोड, जनवाडी, पोलीस लाईन आदी.
एस. एन. डी. टी. (एम. एल. आर.):
लॉ कॉलेज रोड, मयुर कॉलनी, बीग बाझार परिसर, युको बँक कॉलनी, टँकर पॉईंट, स्वप्नमंदीर, हिमाली सोसायटी, करिष्मा सोसायटी, वारजे वॉर्ड ऑफिस परिसर, नळस्टॉप, निलकमल, मधूचय, शैलेश, रघुकुल, स्वस्तिश्री, अनुरेखा, स्थैर्य ( Pune Water Supply) इत्यादी.
चतुःश्रृंगी टाकी परिसर:
औंध, बोपोडी, खडकी, पुणे विद्यापीठ, आनंदपार्क, सकाळनगर, चव्हाणनगर, नॅशनल सोसायटी, सिंध सोसायटी.
जुने वारजे जलकेंद्र:
रामनगर, माळवाडी, विठ्ठलनगर, ज्ञानेश सोसायटी, मामासाहेब मोहोळ शाळा परिसर, एनडीए रोडचा काही भाग, पॉप्युलर कॉलनी आदी.
नागरिकांना आवाहन:
सर्व संबंधित परिसरातील नागरिकांनी पाण्याचा साठा करून ठेवावा आणि आवश्यक ती खबरदारी घ्यावी. पुणे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने नागरिकांना सहकार्य करण्याचे ( Pune Water Supply) आवाहन केले आहे.